जळगांव – एखाद्याला कुणालाही ब्रम्हज्ञान सांगण्याची, दुसऱ्याच्या चुक्यांवर बोट ठेवून हिनवण्याची, दुसऱ्यांच्या घरात काय शिजतंय याची उत्सुकतेनं महिती घेवुन ती चव्हाट्यावर मांडण्याची, नको त्यात नाक खुपसून हुसरेगिरी करण्याची फार सवय असते. पण अशा लोकांची खोड जेव्हा घरातलेच काढतात तेव्हा त्याला नक्कीचं जाणीव होत असावी की,”वेदना” नावाचा शब्द किती खोलवर जखम करून जातो.
संकटमोचक पदवीने राज्यभर नावलौकिक असलेले राज्याचे ” ग्राम विकास” मंत्री गिरीष महाजन यांचा आपल्याच मतदार संघातील ” ग्राम विकासाचा ” एक आदर्श मांडणारा व्हिडिओ सध्या राज्यभर फिरत आहे. राज्यभर ग्रामविकासाच ब्रम्हज्ञान सांगता सांगता आपणच कधी कोरडेपाषण राहिलो याचं भानच त्यांना राहिलं नाही म्हणूनच की काय त्यांच्या मतदार संघातील लिहा तांडा मधील मर्द ग्रामस्थांनी हवेत उडणाऱ्या महाजनांची “ओ गिरिषभाऊ महाजन” अशी आरोळी देवून एका झटक्यात जमिनिहकीकत राज्याच्याच्या नजरेसमोर ठेवली .ज्याला जग भित त्या पाटीलबुवाची घरात पत ,प्रतिष्ठा, योग्यता किती लयास गेली आहे यावर ही एक आरोळी शिक्का मोर्तब करून गेली.
खरं तर ते ग्रामविकास मंत्री असतानाही जर त्यांच्या मतदार संघाची अशी अवस्था असेल तर महाराष्ट्राने त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या. खरं सांगायचं झालं तर जळगांव जिल्ह्याच सर्वाधिक वाटोळं जर कुणी केलं असेल तर ते दोन लोकांनी केलं असं राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.त्यातले एक म्हणजे गिरीष महाजन आणि दुसरे म्हणजे गुलाबराव पाटील. जलसंधारण मंत्री असताना गिरीष महाजन यांनी जिल्ह्यातली सगळी धरणं पूर्ण केली असती आणि सहकार मंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांनी साखर कारखाने आणि सूतगिरण्या कार्यान्वित केल्या असत्या तर आज जळगांव जिल्हा पश्चिम महाराष्ट्राची बरोबरी करत राहिला असता हे अनेकांचे मत आहे नव्हे तर ते वास्तव कुणीही नाकारू शकणार नाही.
एकाने उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला मुक्तहस्ते पळवायला मदत केली. तर दुसऱ्याने जगविख्यात विक्रम असा केला की ते जगातले पहिले असे मंत्री की ज्यांनी कर्तव्यापासून पळ काढण्यासाठी स्वताच्या खात्याची इभ्रत स्वतःच “चिड्या मारायची बंदूक”संबोधून विकली. जळगांव जिल्ह्याचे दुर्भाग्य असावं म्हणून जळगांव जिल्ह्याच सर्वाधिक वाटोळं करणारी नेतृत्व डोक्यावर घेण्याची दुर्बुद्धी आम्हाला सुचली असावी असं मत आमचे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील हे नेहमी व्यक्त करतात.