ब्रेकिंग न्यूज
रवि. डिसेंबर 22nd, 2024

कॉंग्रेसची जलेबी , भाजपचा गुलगुला !

कमळ

कमळ

हरियाना आणि जम्मू  काश्मीर विधानसभेचा निकाल काल  लागला .मागच्यावेळी बहुमत गमावलेल्या भाजपने यावेळी स्पष्ट बहुमत मिळवत हरियानात सत्ता कायम राखली तर जम्मू काश्मीर मध्ये १० वर्षानंतर झालेल्या निवडणुकात भाजपला सत्ता जरी मिळवता आली नसली तरी २९ जागा मिळवत चांगल यश भाजपला पहिल्या प्रयत्नात येथे  मिळवता आल .त्यामुळे भाजपात सध्या आनंदी आनद आहे .आनंद यासाठीही आहे कि ,शेतकर्यांना इतक छळूनही ,विग्नेश फोगट सारख्या खेळाळूवर झालेल्या अन्यायाची धग ताजी असतानाही ,प्रचंड विरोधी वातावरण असतानाही हरियानात बहुमत मिळाल याचा अधिक आनंद भाजपला आहे .त्यामानाने महाराष्ट्रात मागे जे काही घडवले ते फार कमी आहे . किंबहुना महाराष्ट्रातील जनता विसराळू असल्यामुळे  काही दिवसात महाराष्ट्रात होणाऱ्या  निवडणुकांच्या दृष्टीकोनातून भाजपचा आत्मविश्वास वाढणे स्वाभाविक असून गुलीगत गुलगुला खात आहेत .

परंतु असे जरी असले तरी ज्या प्रमाणे भाजप कॉंग्रेस विषयी नाकारात्मता सेट करण्याच्या प्रयत्न करत आहे तसं  कॉंग्रेसच फार मोठ अस कुठलही नुकसान या निवडणुकांमध्ये झालेलं दिसत नाही . उलट अर्थी  कॉंग्रेस पक्षाची  कामगिरी हरियानात सन २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत सुधारली आहे .या निवडणुकांमध्ये जे नुकसान झाले ते स्थानिक छोट्या पक्षाचं झालंय . सन २०१४ मध्ये कॉंग्रेसला फक्त १५ जागा हरियानात  मिळाल्या होत्या .त्यात २०१९ ला सुधारणा होवून कॉंग्रेसने ३१ जागा मिळविल्या होत्या .आणि  २०२४ च्या निवडणुकीत जरी कॉंग्रेसला परिस्थिती अनुकूल असतानाही बहुमत  मिळाले नसले तरी मागच्या वेळी मिळविलेल्या ३१ जागांचे नुकसान न होवू देता त्यात ६ जागांची भर करून  ३७ जागा मिळविल्याने त्यांची  कामगिरी सुधारली आहे असेच म्हणता येईल .त्यामुळे भाजप आज जरी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून वातावरण निर्मितीसाठी हरियाना आणि जम्मू काश्मीर च्या निवडणुकांच्या निकालावर महाराष्ट्राची निवडणूक जिंकण्याची शेखचिल्ली स्वप्न पाहत असेल तर तो तितकाच अधिकार कॉंग्रेसला देखील आहे हेही नाकारता येणार नाही .परंतु महाराष्ट्राची परिस्थिती या राज्यांपेक्षा  फार वेगळी आहे .

मुळात महाराष्ट्रात भाजपला स्वताच स्वतंत्र अस अस्तित्व शिद्ध करायला दोन अडथळे आहेत .जे कि ते भाजपने स्वतः निर्माण करून आफत ओढवून घेतली आहे . दीर्घकाळाच्या राजकारणाचा विचार  न करता निव्वळ सत्ता मिळविण्याच्या हव्यासापोटी व अल्पकाळच्या समाधानासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून  पक्ष फोडाफोडी  भाजपने केली  .ज्यांच्यावर दस्तुरखुद मोदींसह ,इतर भाजपच्या नेत्यांनी  भ्रष्टाचाराचे आरोप लावले त्यांनाच बोकांडी बसवून, आपला बाब्या बाजूला सारून दुसर्यांचे कारटे उरावर बसविण्याचे धोरण स्वीकारले . हे जसे  जनतेला पटले  नाही तसे ते भाजपच्या जमिनिस्तरच्या कार्याकर्त्याना ही पटले नाही  .परिणामी जे पक्ष फोडले त्या पक्षांच्या नेतृत्वाबद्दल राज्यात प्रचंड सहानुभूती निर्माण झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून ” अति घाई संकटात नेई ” या म्हणी प्रमाणे  लोकसभा निवडणुकीत भाजपला केल्या कर्माचे फळ मिळाले .अस म्हणायला हरकत नसावी  .

अस म्हणतात कि ,” बुंद से गयी वो हौद से नही आती “.लाख कितीही भाजपने  म्हटलं कि ,भाजप नेतृत्वाच्या  कौशल्याने विविध योजना राज्य सरकारच्या मध्यामातून जनतेच्या भल्याच्या आणल्या .परंतु त्याचे श्रेय घेण्यात मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार जितके सरस ठरले तितके त्याचे श्रेय भाजपला व त्यांच्या चाणक्याला घेता आले नाही . राज्यातल्या महिला अत्याचाराच्या असंख्य घटना या दोन वर्षात घडल्या .गृह खात्याची जबाबदारी भाजप नेतृत्वाकडे आहे .त्यामुळे ते ना  वाढते अन्याय अत्याचार रोखू शकले .ना त्यांची स्वतंत्र अशी अक्व्टीव्हीटी शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेला दिसून आली . प्रचंड महागाई ,बेरोजगारी ,आरक्षणाचे प्रश्न ,पीकविमा ,न मिळणारे शेत मालाचे भाव ,वाढते अन्याय अत्याचार ,रखडलेले सिचनाचे प्रश्न ,सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून फेल ठरलेले गृह खाते ,वाढते घरगुती वापराचे विजेचे दर या सगळ्या प्रश्नांसाठी जनता शिंदेना जबाबदार धरत नाही तर भाजपला पर्यायी मोदी अन फडनाविसाना जबाबदार धरते .

भाजप अन फडनाविसांची   प्रतिमा मराठा आंदोलनासह इतर आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर खालावली .या आंदोलनांचा परिणाम शिंदे यांच्यावर होण्याएवजी तो रोख सगळा फडनाविसांकडे वळल्याने फडनाविसांची  सध्या मोठी गोची झाली आहे  .सांगता येत नाही अन सहनही होत नाही अशा अवस्थेमुळे  अनतरावाली सराटी येथील मराठा आंदोलनावरील लाठीचार सारखे त्यांच्या  खात्याचे चुकीचे पाऊले पडली .खर तर तोंड दाबून बुक्क्याचा मार कोण देतंय हेही फडनाविसाना कळेनासे झालंय .त्यामुळे परिणामी पक्षच अडगळीत पडल्यासारखी स्थिती सध्याची आहे .त्यात भरीसभर भाजपातल्या काही वाचाळविरांमुळे भाजपची प्रतिमा जनतेच्या नजरेत भरण्यास अधिक कारणीभूत ठरली आहे . ते जनतेच्या मनावर पडलेले घाव सतत ताजे करत असतात .

विशेष म्हणजे कुठल्याही वाईट गोष्टीला ,निर्णयाला फडनाविसच कसे जबाबदार आहेत अशी प्रतिमा विरोधकांकडून निर्माण करण्यात येत असताना सत्तेतल्या घटक पक्षाचे नेते  शिंदे आणि अजित पवार व त्यांच्या गटाची चुप्पी यावर शिक्का मोर्तब करत गेली .किंबहुना भाजपातील व  शिंदे किवा पवार गटाच्या लोकांकडून काही चुकीच्या प्रतिक्रियाही दिल्या गेल्या  तरी त्या त्यांना फडनाविसानीच तसं बोलायला लावलं असाव अस जणू काही समीकरणच झालंय .  चांगल्या कामांचे श्रेय शिंदे आणि अजित पवारांकडे गेले आणि वाईट कामांचे सगळे श्रेय फडणविसांच्या खात्यात जमा झाले .त्यातही आधीच्या सगळ्या निवडणुका फडनाविसांच्या नेतृत्वात लढल्या जायच्या परंतु  जणू काही भाजप विषयी राज्यात  जी नकारात्मकता निर्माण झाली किवा जे काही चुकीचे घडले  त्यास फडनाविसच जबाबदार आहेत असे संकेत  केंद्रीय नेतृत्वानी होवू घातलेल्या निवडणुकांच्या दृस्तीकोनातून बावनकुळे व गडकरी ,फडणवीस अशा तिघांच्या नेतृत्वात लढण्याचा निर्णय घेतल्याने शिक्कामोर्तब करण्यासारखे झाले .राज्यात फडनाविसांची प्रतिमा डागाळण्याच्या दृष्टीकोनातून  शासकीय यंत्रणांचा गैरवापर,पक्ष फोडाफोडी  फडनाविसच करतात हे बिम्बवण्यात जितके विरोधी पक्ष कारणीभूत आहेत .तितकाच केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय देखील शिक्का मोर्तब करण्यात  महत्वाची भूमिका बजावतोय अस म्हटलं तर वावग ठरू नये .एव्हढ मात्र खर कि ,आज फडनाविसांपेक्षा शिंदे हे राज्याचे प्रभावी नेते म्हणून आपली छबी निर्माण करण्यात नक्कीच यशस्वी झाले आहेत . बघूया येणाऱ्या काळात भाजप अजून काय काय सेट करते ते .तोपर्यंत जय हिंद !जय महाराष्ट्र !

२०१९ हरियाना

पक्ष आणि युती लोकप्रिय मत जागा
मते % ± pp जिंकले +/-
भारतीय जनता पार्टी ४,५६९,०१६ 36.49% Increase३.३९ 40 Decrease
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३,५१५,४९८ २८.०८% Increase७.५५ ३१ Increase16
जननायक जनता पार्टी 1,858,033 14.80% नवीन 10 Increase10
इंडियन नॅशनल लोक दल ३०५,४८६ 2.44% Decrease२१.६७ Decrease१८
हरियाणा लोकहित पार्टी ८१,६४१ ०.६६% Decrease०.५६ Increase
बहुजन समाज पक्ष ५१८,८१२ ४.२१% Decrease0.16 0 Decrease
शिरोमणी अकाली दल ४७,३३६ ०.३८% Decrease०.२४ 0 Decrease
अपक्ष १,१२९,९४२ ९.१७% Increase६.३४ Increase2
वरीलपैकी काहीही नाही ६५,२७० ०.५३%
एकूण १२,५२०,१७७ १००.०० 90 ±0
वैध मते १२,५२०,१७७ ९९.८५
अवैध मते १९,०७६ 0.15
मतदानाची टक्केवारी १२,५३९,२५३ ६८.२०
त्याग ५,८४७,४२९ 31.80
नोंदणीकृत मतदार १८,३८६,६८२

२०१९ मध्ये भाजपने हरियाणामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान, “75+” चा नारा दिला होता, मात्र लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देण्याची खोड मोडल्याने भाजपने नारा देण्याची पद्धत बंद केली आहे .असे दिसते .कारण काळ झालेल्या या निवडणुकात असा कुठलाच नारा नव्हता .

हरयाणा  गेल्या  निवडणुकांचा इतिहास काय सांगतो?

पक्ष                 २०१९    २०१४    २००९
भाजप               ४०         ४७        ०४
काँग्रेस               ३१          १५        ४०
जजपा               १०         ००        ००
लोकदल            ०१         १९         ३१
जन. काँग्रेस       ००        ०२         ००
बसपा                 ००        ०१         ०१
शिरोमणी दल     ००        ०१         ०१
अपक्ष                 ०७        ०५          ०७

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights