ब्रेकिंग न्यूज
रवि. डिसेंबर 22nd, 2024

गिरिषभाउच्या “त्या ” सवयीवर मी न बोललेलं बर ! – एकनाथ खडसे

EKJM

जळगाव जिल्ह्यातील दोन नेत्यांमधील वाद राज्यभर गाजत असतो. आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. गेल्या दोन, तीन दिवसांपासून या नेत्यांमधील वाद रंगला आहे. आता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे. खडसे म्हणाले, मी हे मान्य करतो की गिरीशभाऊ दारू पीत नाही. तंबाखू खात नाही. बिडी पीत नाही. त्यांना कुठलीही “सवय” नाही. मात्र त्यांना एक “सवय” आहे. त्यांची ती “सवय” सर्वांना माहीत आहे. त्यावर मी न बोललेले बरं…! .एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांच्या त्या “सवयी “वर चर्चा रंगली खरी पण नाथाभाऊ सीडी काढणार होते त्या सीडीची गोडी आजपर्यंत उपेक्षितच आहे  .त्या सीडीच आणि “सवयीच “नेमकं काही  साध्यर्म्य आहे का ? याचा एकदा सोक्षमोक्ष झाला तरच ” सवय “ या शब्दावर शिक्कामोर्तब होईल .अन्यथा पोकळ ,निरर्थक आरोप करण हि ” सवय “ नाथाभाऊवर आरूढ झालीय का ? असा प्रश्न उपस्थित करण्याचीच  पत्रकारांमध्ये  अधिक “सवय “ आपण रुजवत आहात अस होईल  . शेवटी प्रत्येक माणूस “सवयीच” गाठोळ आहे अस म्हटलं जात .”सवयी” शेकडो  प्रकारच्या असतात .फरक एव्हढाच कि काही “सवयी “ चांगल्या, तर काही “सवयी “वाईट असतात  . चांगली “सवय’ असण वाईट नाही ,तस वाईट “सवय” असणंही  चांगल नाहीच . त्यामुळे यातली  कुठलीतरी एक “सवय” प्रत्येकाला जडलेली असतेच . एक मात्र हेही खर कि चांगल्या “सवयीची” चर्चा सहसा होत नाही ,पण वाईट “सवयीची” लागण अन चर्चा खूप वाऱ्याच्या वेगाने होते  .त्यामुळे खडसे नेमक्या कुठल्या सवयीमुळे गिरीष महाजन यांच्या सवयीवर बोट ठेवत आहेत ? हा देखील प्रश्न जनतेत उपस्थित होण्याचा  सवयीचा भाग होवू नये एव्हढीच माफक अपेक्षा ठेवण्याची “सवय” आम्हा पत्रकारांची अबाधित ठेवावी  . तस गिरीश भाऊ म्हणजे राज्याचे संकट मोचक .त्यांच्यावर संकट ओढवेल अशी “सवय” ते लावून घेणार नाहीत असा माझा तरी समज आहे  .पण ते “सवय “कोणती यावर सगळ अवलंबून आहे .एकदा त्या सवयीचा  खुलासा अगदी मोकळ्या मनाने  नाथाभाऊ यांनी केला तर आमच्याही ज्ञानात नक्कीच भर पडेल .लिहायचं खूप होत .परंतु मला वाटत ती ” सवय “एव्हढीच सीमित ठेवलेली बरी .सवयाला फाटा देत  ” सवय”  या शब्दावर तूर्तास इतकच .

 

 

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights