एखादा मंत्री किंवा नेता प्रसिद्धी आणि स्टंटबाजीच्या नशेत अन् वेगळ्याच विषयात रममाण झाला की, आपण आणि आपली जबाबदारी काय आहे हेही विसरतो. मग अशा माणसावर निष्रियता प्रचण्ड प्रमाणात विजय मिळवते. परिणामी त्याच्याकडे असलेल्या जबाबदारीच्या क्षेत्रात या निष्क्रिय व संवेदना हरविलेल्या नेतृत्वामुळे मोठ्याप्रमाणावर बेइमानी, गैरव्यवहार, भ्रष्टाचार सक्रीय होतो. त्यामुळे सर्वसामान्य जनता व प्रामाणिक सेवा बजावणारे कर्मचारी नाहक भरडले जातात, नाडले जातात. याच ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले ग्रामविकास मंत्री यांचे खात्यांतर्गत येणारी जळगावची जिल्हापरिषद हे जणू काही भ्रष्टाचार व गैरव्यवहार याचे कुरणच झाले आहे याचा प्रत्यय देणारी अनेक उदाहरणे गिरीष महाजन यांच्याच काळात सर्वाधिक उघडकीला आलीय.मात्र झोपलेल्याला जागे करता येत पण ज्याने झोपल्याचे सोंगच घेतलं असेल तर त्याला कुठलाच इलाज राहत नाही .
कुठल्या अन कुठल्या कारणाने जळगाव जिल्हापरिषद नेहमीच चर्चेचा विषय झालीय .महिन्याला किवा एखाद महिन्या आड एकतरी अधिकारी ,कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला जातो .कुठल्या अन कुठल्यातरी इमाने इतबारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अन्याय होतो .सर्वसामान्य जनतेला त्यांच्या प्रश्नाला तर काहीच किंमत उरली नाही .वास्तविक महाराष्ट्रात संकटमोचक म्हणून ख्याती मिळविणाऱ्या गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी असताना त्यांच्याच जिल्ह्याची अवस्था इतकी वाईट असेल तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची किती दुर्दैवी अवस्था असेल हे यावरून दिसून येते .मध्यंतरी माजी खासदार उन्मेष पाटील यांनी गिरीश महाजन म्हणजे संकटमोचक नावाची एक अंधश्रद्धा असून तेच जिल्ह्यावरील मोठ संकट आहेत अस म्हटलं होत .काही अंशी त्यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याची जाणीव आता जिल्ह्याला देखील व्हायला लागली आहे . जर मंत्र्यांचे स्वताच्या खात्यावर नियंत्रण नसेल ,खात्याच्या कारभाराकडे अक्षम्य दुर्लक्ष असेल तर अशा माणसाने शासनाची ,पक्षाची ,जनतेच्या आशा आकांक्षांची राखरांगोळी करण्यापेक्षा निष्क्रियतेची जबाबदारी मोठ्या मनाने स्विकारून त्या पदाची बूज राखण्यासाठी नैतिकता बाळगून त्या पदापासून दूर झाले पाहिजे .एखाद खात्याचे मंत्रिपद जर जिल्ह्याला कुणाच्याही माध्यमातून भेटलं तर त्या जिल्ह्याच्या जनतेच्या आशा आणि आकांक्षा यांना नक्कीच मूर्त स्वरूप मिळेल व अनेक वर्षापासुनाची जिल्ह्याची विकासाची दरी भरून निघेल,ढेपाळलेली प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा होईल अशी अपेक्षा जिल्ह्याची असते .पण त्यासाठी ते नेतृत्व तितकच अभ्यासू अन त्या हेतूने काम करणारे असेल तर त्यात अर्थ असतो ! अन्यथा सध्याच्या स्थितीप्रमाणे ते पद आणि अपेक्षा वांझोट ठरतात .
जळगाव झेडपी ही भ्रष्टाचाराची शाळा.
सामाजिक कार्यकर्ते श्री शिवराम पाटील यांची सर्वाधिक व्हायरल होणारी पोष्ट
ते अस म्हणतात कि ,दरमहा एक दोन मुख्याध्यापक किंवा शिक्षणाधिकारी किंवा कारकून लांच घेतांना पकडले जात आहेत.कारण लांच घेणे हे येथे कदाचित शिकवले जात असावे .म्हणून प्रथा परंपरा चालविली जात आहे.जेष्ठ मास्तर, कनिष्ठ मास्तर कडून लांच घेतो .मोठा भाऊ लहान भाऊला लुटतो. मोठा मासा , लहान मासाची शिकार करतो अगदी याप्रमाणे .म्हणजे लाचखोरीचा अतिरेक काय असतो त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जळगाव जिल्हा परिषद .भरती करतांना लांच, अप्रोव्हल साठी लांच, प्रमोशन साठी लांच ,बदली साठी लांच, रिटायर सेटलमेंट साठी लांच .अशा विविध माध्यमातून येथे लाचखोरांनी अगदी कहर केला आहे.आणि हे कोण करतो? पोलिस,तलाठी,टीसी नाही.हे दस्तुरखुद्द शिक्षक, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, संस्था चेअरमन.आणि हेच लोक मला गांधीजी, नेहरू,शास्त्रीजी शिकवत होते.यांनीच मला शिवाजी महाराज,राणा प्रताप, भगतसिंग,नेताजी सुभाष शिकवला होता.यांनीच मला रामायणातील दाखले दिले होते.यांनीच मला गीता वाचून दाखवली होती.आणि हेच असे करीत असतील तर , कोणत्या सिपाईला सांगू? तू खुशाली घेऊ नकोस!कोणत्या वेटरला सांगू ?तू टिप घेऊ नकोस!
मी स्वतः साक्षीदार आहे,या पापी घटनांचा.अमळनेरला चेयरमनने(चोरमन) सरांना सांगितले होते,हे पावती पुस्तक घ्या आणि वर्गणी जमा करा.चेयरमन ने सांगितले होते, प्राचार्य पदावर राहायचे असेल तर इतके लाख मला द्या.नाही ऐकले तर प्राचार्य निलंबित!
मी स्वतः साक्षीदार आहे.जळगांवच्या शिक्षण संस्थेच्या चेअरमन ने प्राचार्य चे रिटायर सेटलमेंट पंधरा महिने अडवून ठेवले होते त्या घटनेचा .त्याच चेअरमन ने त्याच प्राचार्य चा जाहीर सत्कार केला होता.का केला होता?ते रहस्य उलगडलेच नाही. शिक्षण खाते सांगायला सांगतात पवित्र आहे.नाही हो!यांचे पेक्षा गंगुबाई काठियावाडी प्रामाणिक होती.खाजगी शाळेतील शिक्षकांनी जाहीर सांगावे, आम्ही भरतीचे पैसे दिले नाहीत.आम्ही अप्रोव्हलचे पैसे दिले नाहीत.आम्ही प्रमोशनचे पैसे दिले नाहीत.आम्ही बदलीचे पैसे दिले नाहीत.आम्ही रिटायर सेटलमेंटचे पैसे दिले नाहीत.प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकाने एक लाख दिल्याशिवाय पेन्शन,फंड, ग्रॅच्युइटी,लिव्ह एनकॅशमेंटची रक्कम मिळत नाही.कॉलेजमधे हा दर पांच लाखाचा आहे.शिक्षक रिटायर झाला तर त्याला वाटते ,माझी कत्तलखान्यातून सुटका झाली.
आता हे मी लिहीतो,बोलतो.ते झेडपी सीईओला माहिती नसेल का? शिक्षक उपोषणाला बसला ते त्याला दिसले नसेल का? म्हणे मी आयपीएस आहे! मला नाही वाटत,परीक्षा देऊन पास झाला असेल.तो सीईओ मला तर २ ऑक्टोबरला गांधीजी आणि शास्रीजी सोबत दिसला होता.काही लाज लज्जा शरम नसेल तर कशाला गांधीजी नेहरू शास्त्रीजी पुजता रे!नालायकांनो!
मी माहिती घेतली युपीएससी आणि एमपीएससी कॅडेट अकादमी मधे भ्रष्टाचाराचे उत्तम प्रशिक्षण दिले जाते.तेथून आपल्याकडे आलेला कलेक्टर,एसपी, सीईओ, आयुक्त, तहसीलदार बीडीओ, फौजदार प्रॅक्टिकल करतात.येथे आपणच निवडून दिलेले चोर आमदार, खासदार आणि पालकमंत्री त्यांना सोबती होतात.गुलाबराव पाटील, सुरेश भोळे, गिरीश महाजन, शिरीष चौधरी, किशोर पाटील, अनिल पाटील,चिमण आबा यांना हे कळत नसेल का? कळते! पण चोर चोर मावस भाऊ! दोन्ही मिळून लुटून खाऊ! अस नसेल कशावरून .
आता हे आपले आमदार खासदार मंत्री निवडणूक आली तर राणा भिमदेवी भाषणे ठोकतात.चालू,चमचे,चाटू टाळी वाजवतात.कालच अनिल पाटील भाषणात म्हणाले,मी २०१९ ची निवडणूक लढवली तेंव्हा माझ्या खिशात पांचवें रूपये नव्हते.तर आम्ही विचारतो,तर मग आता खिशात, बॅंकेत,शेतात, खळ्यात,मळ्यात किती ठेवलेले आहेत?काय ठोकता पाटील साहेब! लोकांना मुर्ख समजतात का? आता या निवडणुकीत लोक तुम्हाला मुर्ख बनवणार आहेत .तुमचेच पैसे घेऊन दुसऱ्याला मत देणार आहेत.हाच एक पर्याय ठेवला आहे,मोदी ,शहा, फडणवीस यांनी.
या शिवाय खात्यातील गौडबंगाल आणि भ्रष्टाचाराला घाबरून आमच्या आमदारांनी दारू विकणे पसंत केले आहे.दारू आणि सट्टा जरी सरकारने आणि समाजाने निषिद्ध मानले असले तरीही शंभर टक्के इमानदारी असते.तितकी कोणत्याही खात्यात नाही.शिक्षण खात्यात तर मुळीच नाही.
आता ह्या मास्तरीण बाई अन्याय झाला म्हणून उपोषणाला बसल्या आहेत .एकाही अधिकारी आणि पुढारीला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.याच झेडपीचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तिकडे फास्ट बोट ची मजा घेत आहेत.काही लाज लज्जा शरम नसेल तर ! जर या शिक्षक महिलेवर खरोखरच अन्याय झाला असेल तर आजच ,या क्षणाला त्यांचेसाठी कायदेशीर,लेखी आदेश काढता येतो. त्यासाठी कोणतेही पंचांग पाहाण्याची,सबब सांगण्याची गरज नाही.तिकडे मुख्यमंत्री शिंदे लबाडी मारतात,म्हणे माझी लाडकी बहिण!काय माणूस आहे? वेडे समजतात का जळगावच्या लोकांना? जसे ठाण्याच्या लोकांना समजतात तसे .निवडणुका जाव्वळ आल्या ,लोकसभेला झटका बसला म्हणून बहिण आठवली ,भावावर प्रेम दाटल . अन हे पैसे कुणाचे तर आमचेच .प्रचंड महागाई करून पैसे जनतेकडून वसूल केले जात आहे .आवळा देवून कोहळा अस सगळ सुरु आहे .
पण वाईट एका गोष्टीच वाटत कि ,एक शिवराम पाटील पोटतिडकीने या सगळ्या प्रश्नांवर एकटा बोलतो .ज्याचं जळतय त्यांना कळत नाही .ते पुढ येत नाही .कारण ते या पुढार्यांचे कुणी चाटू ,कुणी चमचा ,कुणी व्हलग,कुणी पिट्टू , कुणी गळ्यातला तर कुणी रात्रीच्या बैठकीतला फिटाड झालंय .या सगळ्या उपाध्यांनी सन्मानित मुर्दाड मनाच्या लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय .का तर माझी मानस वाहत चाललीय याच वाईट वाटत .पटल तर घ्या .अन माझ्या ह्या मोहिमेत सामील व्हा .अन्यथा भ्रष्टाचार ,गैरव्यवहार विरुध्द माझ ही लढाई मी सुरूच ठेवणार त्या लोकांसाठी जे व्यक्त होवू शकत नाही.जे अशिक्षित आहेत .जे दिन आहेत .जे दलित आहेत .जे विचारी आहेत .जे सुज्ञ आहेत .जे जाणकार आहेत .ज्यांना वाटत हे सगळ मिटल पाहिजे त्यांच्यासाठी …..रामराम
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव