ब्रेकिंग न्यूज
रवि. डिसेंबर 22nd, 2024

पत्रकार व्हायचंय! मग ही बातमी नक्की वाचा!

gmj
भाजपला पहिल्यांदाच मिळेल महिला राष्ट्रीय अध्यक्ष ?

नमस्कार मित्रांनो ,

गल्लिमैदान न्यूज “हे ब्लॉग पोर्टल जगातल्या सर्व भाषांमध्ये उपलब्ध असलेले 600000 सहा लाख वाचक संख्या असलेले एक अग्रगण्य बातम्यांच व्यासपीठ आहे, जे आपल्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय,आर्थिक, गुन्हेगारी,व्यापार, विधी व न्याय,कृषी, विवीध विकास योजना, जागतिक घडामोडी याच्याशी निगडित बातम्यांचे वास्तव आपल्या समोर निर्भीड निःपक्षपने मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असते. आमची ”रोखठोक live ,सैराट न्यूज ,झिंगाट वार्ता हि देखील वेब पोर्टल आहेत .ती लवकरच विस्तार स्वरुपात सुरु करत आहोत .

आम्हाला असं वाटत !

येणारा काळ हा निवडणुकींच्या हंगामाचा काळ आहे.त्यामुळे ग्रामीण भागातले प्रश्न ,समस्या अन निर्ढावलेले प्रशासन ,वाढते अन्याय ,अत्याचार अन झोपलेली यंत्रणा ,याला जबाबदार निष्क्रिय लोकप्रतिनिधी यांना आता जाब विचारण्याची वेळ येवून ठेपली आहे .सर्वाना कर्तव्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे . आमच्या टीम ने विद्यमान आणि संभाव्य उमेदवारांचा पाच वर्षाचा कामकाजाचा ७/१२ काढलेला आहे .तो जनतेसमोर निर्भीडपणे आम्ही मांडणार आहोतच .

जिल्ह्याच वाटोळ कोणत्या नेत्यांनी केल ?कोणी ५ वर्षात किती बोंब पाडली . जिल्ह्याच्या सर्वाधिक नुकसानीला कोण जबाबदार आहे ?,खोक्याचे राजकारनापासून ते गद्दार ,खुद्दार पर्यंत सगळा लेखाजोखा गल्लीमैदान जनतेपुढे निर्भीडपणे मांडणार आहेच .तस चांगल काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा कामाचा लेखाजोखा देखील मांडणार आहोत . त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात गल्लीमैदानची एक स्वतंत्र २५० तरुण पत्रकारांची मोठी टीम उभी करावयाची आहे. अनेक संकल्पना व अनेक महत्वाच्या विषयांवर सांघिकपणे काम करावयाचे आहे .

अर्थात पत्रकारिता करतांना एखाद्या नेत्याच्या ,व्यक्तीच्या, पक्षाच्या,प्रशासकीय अधिकारी किंवा सरकारच्या विरोधात प्रखरपणे मत मांडण ,चुका निदर्शनात आणून देण किवा चुकीच्या कारभाराविषयी ,धोरणाविषयी माध्यमांच्या व्यासपीठावरून व्यक्त होण म्हणजे त्या नेत्याच्या ,व्यक्तीच्या, पक्षाच्या,प्रशासकीय अधिकारी किंवा सरकारच्याबद्दल आकस आहे असा मुळीच अर्थ नसतो .त्यात बदल घडावा ,सुधारणा व्हावी,,जनतेच्या ,कार्यकर्त्यांच्या आशा आकांशांचा सन्मान व्हावा हाच काय तो निर्भीड ,निपक्ष पत्रकारिता म्हणून पत्रकाराचा व्यक्त होण्यामागचा हेतू असतो. असा आमचा पक्का समज आहे

सर्वात महत्वाचे म्हणजे पत्रकारिता हे आर्थिक कमाईचे साधन नसून अन्याय्य , अत्याचार, झुंडशाही व व्यवस्थे विरुद्ध आवाज उठवून, रंजल्या गांजलेल्या घटकांना न्याय मिळवून देणारं परमार्थिक साध्य आहे. जे पैशाच्या श्रीमंती पेक्षा आत्मिक समाधानाच्या संचितातून मनाच्या गर्भ श्रीमंतीच ध्येय साध्य करते.

पत्रकारिता हे माध्यम कुणावर दबाव किंवा सेखी मिरविण्याचे माध्यम नसून समाजात प्रतिष्ठा, मान, सन्मानाच्या शेखाचिल्ली अभिलाशेचे इमले बांधण्याचे देखील माध्यम नाही. पत्रकारिता हे माध्यम छंद म्हणून मुक्तपणे, निर्भीड, निःपक्षपने अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई लढण्याचे धाडस आहे. हे करतांना व्यवस्था व राजकारण्यांकडून “बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल!” हा सूर्य हा जयद्र रथ! या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास आणि संबंध प्रस्तापित करण्याचा मार्ग सुकर होतो. ज्यामुळे स्वतःसह इतरांचेही जगणे सोपे होते.

तुम्हाला खरच करायची या ध्येयाने वाटचाल !

जळगाव जिल्ह्यातल्या २ हजार लोकसंख्या वरील प्रत्येक गावात आम्हाला पत्रकार नेमावयाचे आहेत .त्यासाठी धाडसी आणि या क्षेत्राविषयी आवड असलेले तरुण तरुणी यांना यासाठी प्राधान्य आहे .शिक्षण किमान १२ पर्यंत झालेले असावे .आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या उपजीविकेचे काम सांभाळून उर्वरित वेळेत छंद म्हणून पत्रकारिता करावयाची प्रामाणिक तयारी असली पाहिजे .त्यासाठी कुठलेही मानधन अथवा इतर कुठलेही लाभ/भत्ते आमच्याकडून दिले जात नाही .पत्रकारितेचे ट्रेनिंग मात्र मोफत दिले जाईल. विशेष म्हणजे पत्रकारिता करण्यासाठी लागणारी साधन सामुग्री देखील तुम्हाला स्वता घ्यावयाची आहे.

”थोडक्यात म्हणजे मामाच्या बकऱ्या अन उकीरड्यावर भाकरी ”अस जरी फुकट फौजदारीच हे क्षेत्र असल तरी ज्यांना व्यवस्था चालविण्याचे ,सरकार चालविण्याचे अधिकार प्राप्त आहेत अशांना जाब विचारण्याची हिम्मत असणारा ,त्यांचा गैरकारभारावर ताशेरे ओढून त्यांना वठणीवर आणणारा बिन पगारी फुल अधिकारी जर कोण असेल तर तो पत्रकारच असतो . त्यासाठी तितका अभ्यासू ,हुशार ,चाणाक्ष अशा पत्रकारांची टीम आम्ही उभी करण्याचा निर्णय घेतला आहे .

आपण ज्यांना ट्रेनिंग देवू अशा शकावू पत्रकारांना सहा महिन्याचे शिकावू पत्रकार म्हणून ओळखपत्र दिले जाईल .सहा महिन्या नंतर एक वर्ष मुदतीचे ओळख पत्र मिळेल. त्याची दरवर्षी कामाची योग्यता तपासून मुदत वाढवून दिली जाईल . ज्यांना कुणाला आमच्याशी जुळायचे आहे .अशा होतकरू ,धाडशी व पत्रकारितेची आवड असणार्यांनी कुणाच्या 3 पाट पुढाऱ्यांच्या शिफारशी पेक्षा वडिलांचा ( तुमचे उपजीविकेचे साधन असल्याबाबतचा आणि वर्तणुकीचा) दाखला घेवून खालील नंबरवर संपर्क करावा . वडिलांचा दाखला आमच्यासाठी अधिक किमतीचा आहे.

संपर्क -संपादक -गणेश पाटील मो .न. ८९९९११७२१५

दररोज परमेश्वराला आमची एकच विनंती असते आणि ती म्हणजे ”परमेस्वरा ,परिस्थितीचे दारिद्र्य मान्य आहे आम्हाला ,बुध्दीच्या दारिद्र्यपेक्षा! फक्त त्यात काटकसर करू नको म्हणजे झाल !

गणेश पाटील संपादक”गल्लिमैदान न्यूज”जळगांव

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights