पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे, धंगेकर यांनी पुणे पोलिसांना लिहलेल्या पत्रामध्ये पिडीत मुलगी ही विशेष म्हणजे पीडित मुलगी ही एका प्राध्यापकाची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे: शिक्षणाचं माहेरघर आणि रांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात देखील गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपुर्वी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी (दि. 24) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे, दरम्यान काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलिसांना लिहलेल्या पत्रामध्ये पिडीत मुलगी ही विशेष म्हणजे पीडित मुलगी ही एका प्राध्यापकाची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. प्राध्यापकाने याबाबतची तक्रार ट्रस्टींकडे केली होती, परंतु ट्रस्टींनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे.
आरोपींपैकी काही मुले मोठ्या बापांची मुलं?
बलात्कार करणाऱ्या मुलांपैकी काही मुले ही मोठ्या बापांची अवलाद असून त्यातील एक मुलगा हा उप-जिल्हाधिकारी (प्रांत-अधिकारी) यांचा मुलगा असून संस्थेचे ट्रस्टींशी त्यांच्याशी गैरमार्गाचे आर्थिक हितसंबंध आहेत. त्यामुळे आरोपी मुलाला वाचविण्याकरीता पीडित मुलीच्या वडिलांवर (प्राध्यापक) दबाव आणत आहे अशी चर्चा महाविद्यालयांतील सेवक वर्गात चालू आहे. त्यामुळे संस्थेचे ट्रस्टींशी आणि महाविद्यालयांचे अधिकारी यांची भूमिका ही अतिशय संशयास्पद आहे असे दिसून येते, असं काँग्रेस नेते आणि आमदार रविंद्र धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे खरंंच पिडित मुलीच्या पालकांवर संस्थेने दबाव आणला का, बड्या बापाच्या मुलांना या प्रकरणी वाचवलं जात आहे का याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली जात आहे.
कोरेगाव पार्क ड्रग्स पार्टी व महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे.
शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या व राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत घडणाऱ्या अश्या घटनांची मी नेहमी दखल घेत सखोलपणे या घटनांचा मागोवा घेत असतो, प्रत्येक… pic.twitter.com/w8t27CRM7S— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) September 26, 2024
नेमकं प्रकरण काय?
दोन दिवसांपुर्वी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी (दि. 24) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये पीडित तरुणी शिक्षण घेते. तर आररोपी देखील याच महाविद्यालयात 11वी,12वीचे शिक्षण घेत आहेत. त्यातील एकाने पीडितेला पार्टीसाठी म्हणून आरोपींपैकी एकाच्या फ्लॅटवर नेले. तेथे गेल्यावर आरोपींनी ड्रगचे सेवन केले आणि पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेतली.
हा संपूर्ण प्रकार एप्रिल पासून घडत आला आहे. पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोन वरून सोशल मीडिया वापरत होती आणि यावरूनच आरोपी तरुणांशी तिची मैत्री झाली. त्यानंतर तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला. या संबधीचे व्हिडिओ देखील आरोपींनी काढल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपी तरुण हे एकमेकांना ओळखत नाहीत. पिडीत तरुणीला भेटण्यासाठी एकाने तिच्यावर महाविद्यालयात अत्याचार केले, तर दुसऱ्याने तिच्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. इतर 2 तरुणांनी सुद्धा तिच्याशी अनेक ठिकाणी सबंध ठेवल्याची माहिती आहे. ही सर्व घटना पिडीत तरुणीने तिच्या मैत्रिणीला सांगितल्या तसेच महाविद्यालयात सुरू असलेल्या गुड टच बॅड टच अभियानात असलेल्या समुपदेशक यांना सांगितल्या. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि पालकांनी पोलिसात धाव घेतली. तर या प्रकरणात ड्रग्जचा काही संबध आला नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
मामीनं केला घात? बर्थडे पार्टीत दारू पाजून दहावीच्या मुलीवर दोघांचा अत्याचार; महाराष्ट्र पुन्हा हादरला
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच राज्यात काही अशा घटना समोर आल्या आहेत जिथं ओळखीच्या व्यक्तींकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. पुण्यात अल्पवयीन मुलीवर चौघांकडून अत्याचाराची घटना ताजी असतानाच अकोलाही अशाच एका घटनेनं हादरलं. जिथं, वाढदिवसाच्या निमित्तानंच दारू पाजत एका मुलीवर अत्याचार करण्यात आले.
अकोल्यातील जुन्या शहरात, दहावीतील मुलीला तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने मित्र, मैत्रीणीसह दूरच्या नात्यातील व्यक्तीसह चौघांनी संगनमतानं जबरदस्तीनं दारू पाजली. नशेच्या आहारी गेलेल्या दोघांनी यानंतर तिच्यावर अत्याचार करून ब्लॅकमेल केलं. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचताच त्यांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करत सदर पीडितेच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान अद्याप तिचे 3 मित्र फरार झाल्याची माहिती आहे.
मावशीकडे शिकायला आली अन् घात झाला…
भुसावळ तालुक्यातील ही 15 वर्षीय मुलगी तिच्या चुलत मावशीकडे म्हणजेच अकोल्यात शिक्षणासाठी आली होती. दारफैल अकोला इथं इयत्ता दहावीत शिकणाऱ्या या मुलीच्या मानलेल्या मावशीच्या मुलीने किरण इंगळे ही मामी आहे, असे सांगून तिच्यासोबत ओळख करून दिली होती.
ओळख झाली आणि तेव्हापासून पीडित मुलीची तिच्या घरी ये-जा वाढली. पुढे किरण इंगळेचा पती लल्ला इंगळेनं पीडितेची ओळख बंटी सटवालेसोबत करून दिली आणि बंटीनं तिची ओळख त्याची प्रेयसी पायलसोबत करून दिली.
ओळख वाढली, या तिघांनी पीडितेला विश्वासात घेत ‘गिरीश नावाच्या माणसाला तू बोल, आपण त्यांच्याकडून पैसे काढू,’ असं सांगत पायलनं तिच्या फोनवरून गिरीश नामक व्यक्तीशी बोलायला लावलं. उपलब्ध माहितीनुसार 9 सप्टेंबर रोजी पीडिचेचा वाढदिवस होता. याच दिवशी ती लल्लाच्या घरी गेली असता तिथं तिला वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्यानं हरिहर पेठ इथं नेण्यात आलं. तिथं लल्ला आणि बंटी दारू प्यायले आणि त्यांनी पीडितेला फसवून तिला शीतपेय सांगत दारु पाजली आणि तिच्यावर अत्याचार केला.
विश्वासातील व्यक्तींनीच अत्यारा केल्याच्या या घटनेमुळं आता पुन्हा एकदा महिलांवरील वाढते अत्याचार आणि या नराधमी वृत्तीनं चिंता वाढवली आहे. इतकंच नव्हे, तर बायका- मुली सुरक्षित आहेत तरी कुठे? हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरितच राहिला.