जळगाव – अंजनी मध्यम प्रकल्प ,पद्मालय क्र .२ या दोन मोठ्या प्रकल्पासोबत खडकेसिम ,मुगपाठ ,पातरखेडे,बाभूळगाव ह्या चार मोठ्या साठवण तलावांची स्वप्नपूर्ती केल्यानंतर त्या सोबतच माझा वाघ्या बर्डी साठवण तलाव झाला पाहिजे अस स्वप्न कधीकाळी म्हणजे १९९५ ला आमदार असताना एरंडोलचे माजी आमदार महेंद्रसिंग पाटील याचं होत .तालुक्यात शेतीला ओलितासाठी आणण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक पाण्याची सुबकता झाली म्हणजे माझा बळीराजा सुखी होईल. हा एकच ध्यास आमदार असताना महेंद्रसिंग पाटलांचा होता . आज तब्बल ३० वर्ष उलटली त्यांच्या काळात राहिलेले अंजनी व पद्मालय क्र .२ चे किरकोळ काम देखील नंतरच्या कोणत्याच लोकप्रतिनिधी कडून झाले नाही .मग वाघ्या बर्डीचा तर विषयच येत नाही .हि सल सातत्याने महेंद्रसिंग पाटील यांना आजही सलते .म्हणूनच त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी संधी साधत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी तडजोड केली . हे प्रकल्प पूर्ण करण्याचा शब्द देत असाल तर तुम्हाला माझ्या तालुक्यातून भरभरून मदत करू असा ठाम विस्वास दिला .आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार संघाचे उमेदवार कारण पवार असताना देखील भाजपच्या स्मिता वाघ यांना भरभरून मदत एरंडोल विधानसभा मतदार संघातून झाली .
भाजपाने देखील दिलेल्या अस्वासनाला जागण्याची आवशकता असल्याचे सांगून मध्यंतरी महेंद्रसिंग पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली .आणि या भेटीत अंजनी प्रकल्प व पदमालय क्र .२ या दोन्ही प्रकल्पासाठी प्रत्येर्की 10 कोटीची आर्थिक तरतूद बजेट मध्ये करवून घेतली .आता प्रश्न राहिला तो वाघ्या बर्डीचा . ज्याच स्वप्न महेंद्रसिंग पाटील यांनी १९९५ मध्ये पाहिलं होत .जे पुन्हा संधी न मिळाल्यामुळे राहून गेल होत .त्यासाठी त्यांनी त्याकाळी खूप मेहनत देखील घेतली होती .नव्हे तर प्रशासकीय मान्यता देखील त्यावेळी मिळवून घेतली होती .परंतु पुन्हा संधी न भेटल्याने हे प्रश्न आजतागायत दुर्लक्षित राहिले. नंतरच्या लोकाप्रतीनिधिनी या प्रकल्पांच्या उर्वरित कामांचा पाठपुरावा केला नाही. आणि वाघ्या बर्डीचा मुद्दा तर कालबाह्याच करून टाकला .आता हा प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा महेंद्रसिंग पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने प्रयत्न सुरु केले आहेत .आणि या प्रकल्पासाठी नार पार प्रकल्पाच्या पाण्यात हिस्सेदारी निश्चित करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे .
उमरे ,आडगाव,अंचलगाव या गावांच्या शिवार मध्यस्थी भागात एक कढई सारखे एक नैसर्गिक क्षेत्र आहे .कि ज्याला विकसित केल्यावर त्यात १५० दस लक्ष घन फुट पाणी साठू शकते .या जागेच्या साठवण क्षेत्राला जवळच लागून जमादा डावा कालव्याची मोठी वाहिनी जाते .त्या माध्यमातून या तलावात पाण्याची साठवण करता येईल .व आजूबाजूच्या किमान २५ ते ३० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व 10 गावांच्या शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल .हे स्वप्न महेंद्रसिंग पाटील यांचे आहे .या अनुषंगाने त्यांनी या साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देवून साकडे घातले आहे .
👇 येथे टच करा