ब्रेकिंग न्यूज
रवि. डिसेंबर 22nd, 2024

वाह रे नेता ! ३५ लाखात शिपाई ! म्हणे ,पैसे इथं ! आर्डर तिथं ! कुणी उघडल दुकान ?

बेरोजगार

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) आणि इंस्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट (IHD) यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 नुसार, या लोकसंख्येतील सुमारे 83 टक्के बेरोजगार लोकसंख्येसह भारतातील तरुण वाढत्या बेरोजगारी मुळे हैराण आहेत . एकूण बेरोजगार तरुणांमध्ये किमान माध्यमिक शिक्षण घेतलेल्या शिक्षित तरुणांचे प्रमाण २००० मध्ये ३५.२ टक्क्यावर होते .ते आता ६५.७ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे .जसे बेरोजगार तरुण रोजगारासाठी परेशान  आहेत .तसेच  त्यांचे कुटुंबीय देखील मोठ्या चिंतेत  आहेत .कारण नेकारी नाही तर छोकरी नाही .बेरोजगारीमुळे अविवाहितांच्या संखेतही वाढ झाली आहे .या संधीचा फायदा घेत जळगाव जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने नोकरी देण्याचा गोरखधंदा सुरु केल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे .३५ लाखात शिपाई ! पैसे  इथं जमा करा ,आर्डर मुंबईत  देतो . त्यामुळे हि चर्चा वाऱ्यासारखी मतदार संघात पोहचल्याने अनेक जण  जे त्या  नेत्याच्यासाठी नेहमी विरोधकांना अंगावर घेतात,स्वताला त्या नेत्याच्या गळ्यातले ताईत ,उजवा – डावा खांदा समजतात  त्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे .

आज प्रत्येत शिक्षित बेरोजगार तरुणाचा बाप मुलाच्या भवितव्यासाठी चिंतीत आहे .एखाद्या पुढार्याची प्रामाणिकपणे बाजू लावून धरली तर निदान मुलाची तो नेता कुठ तरी सोय लावीन म्हणून अनेक बाप माणस आज नेत्यांची जरी तो नेता त्यांच्या पेक्षा वयाने लहान ,(बुद्धीनेही )असला  तरी त्याची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानताना दिसतो .अन नेहमी त्या नेत्याला भेटल्यावर एकच गाऱ्हाणं मांडत असतो कि ,साहेब ,भाऊ ,दादा,अन्ना,आप्पा तेव्हढ आपल्या मुलाच लक्षात असुद्या .त्या शिवाय त्याच लग्न थांबलय .तो नेता नेहमी प्रमाणे एकच सांगतो हो हो जागा निघु द्या  पहिली ऑर्डर तुमच्याच मुलाची .दिवसामागून दिवस निघत जातात .त्या पुढार्याच्या जागा कधी निघत नाही आणि मुलगा कधी लागत नाही .जागा कधी निघून गेल्या असतात  आणि दुसरेच भरले जातात .कधी तरी याला समजत .कधी तरी याला कळत कि ,अमुक अमुकच्या मुलाला नेत्यानेच नोकरीला लावलं .तेव्ह्या आस धरून बसलेल्या या बाप माणसाला मोठा धक्का बसतो .

अशीच अपेक्षा ठेवून  असणारे बाप जळगाव जिल्ह्याच्या ह्या नेत्याकडे चपला झिजवत आहेत .नुकतच कळल कि नेता काही  मुलांना निकारीला लावतोय म्हणे .म्हणून अनेक  बाप मानस त्या नेत्याकडे धावत गेले .पण …..पण .जागा शिपाई पदाची आणि त्यासाठी ३५ लाख द्यावे लागतील अस ऐकल्यावर धक्काच बसल्याने हे स्वताला गळ्यातले ताईत ,उजवा ,डावा खांदा समजणारे ,गावात भावकीत त्या नेत्यासाठी भावाकीतल्याच आपल्या माणसांशी या नेत्यासाठी पंगा घेणारे बाप पश्चातापाने मानातातल्या मनात त्या नेत्याला शिव्या शाप देत माघारी फिरले आहेत .सर्वात मोठा धक्का तर त्यांना तेव्हा बसला जेव्हा कळल कि ,या नेत्यासाठी आपण ज्यांना अंगावर घेत होतो .त्याच्याच मुलाला या नेत्याने शब्द दिलाय म्हणे तेव्हा .

आता  दुख्खी आत्म्यांकडून  या नेत्याचा उद्धार मतदार संघात केला जातोय .तेव्हा विरोधकांना मोठ कोलीत मिळाल्याचा आनंद तर होणारच ! मात्र यामुळे  या नेत्याची मोठी डोके दुखी वाढल्याचे बोलले जात आहे .जवळच विधानसभा येवून ठेपल्याने आताच या नेत्याला नोकरीचे दुकान खोलून गोरखधंदा चालू करण्याची  सुचलेली दुर्बुद्धी म्हणजेच विनाशकाले विपरीत बुद्धी असच म्हणव लागेल .बगुया अजून असे अनेक प्रताप त्या नेत्याचे येणाऱ्या कळत बाहेर येणार आहेत .आणि तेव्हा पुराव्यानिशी आपण नक्कीच भेटू त्या बाप माणसांच्या समक्ष ! तो पर्यंत उघडा डोळे ! राहू नका भोळे !

 

 

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights