ब्रेकिंग न्यूज
रवि. डिसेंबर 22nd, 2024

शरद पवारांचे भाजपला धक्क्यावर धक्के

शरद पवार -अजित पवार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनिती आखल्याचं दिसत आहे. समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता पुण्यात देखील भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. गणेशोत्सवातील एका कार्यक्रमात त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

कोण जाणार पवार गटात?

पुण्यातील वडगाव शेरीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे हे भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. पठारे यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे गणपती मंडळाच्या कार्यक्रमातून हाती तुतारी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

बापूसाहेब पठारे सध्या भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट पडले. अजित पवार गट हा भाजपसोबत गेला. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज आहेत. थेट गणपती मंडळाच्या कार्यक्रमातूनच हाती तुतारी घेण्यात असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं चिन्ह तुतारी असल्याचं बापूसाहेब पठारे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पठारे हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

इंदापुरातील बॅनरने लक्ष वेधलं

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्येदेखील राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. इंदापूरमधील बॅनरने लक्ष वेधलं आहे. इंदापूरच्या आठवडे बाजार आणि आज एक फ्लेक्स भरचौकात लागला होता. त्यावर शरद पवार पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे फोटो आहेत. त्यावर लिहिलेला मजकूर लक्ष वेधून घेत आहे. ‘इंदापूर तालुक्याची झाली तयारी… हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी’, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.

शरद पवार भाजपला खिंडार पाडण्याच्या तयारीत; सोलापुरातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार हे मैदानात उतरले आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी ते दौरा करत आहे. यावेळी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकवण्याचा मानस असल्याच दिसत आहे. कोल्हापुरात भाजपला धक्का दिल्यानंतर आता सोलापुरात शरद पवार अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. सोलापुरातील भाजपचे नेते आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पाठोपाठ शरद पवार यांचं सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष असल्याचं दिसत आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे.

वसंत नाना देशमुख , माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे नेते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. तसंच भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आज दुपारी तीन वाजता बारामती येथे पवारांची भेट घेणार असल्याचि खात्रीलायक माहिती आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने ही भेट होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात सर्वजण प्रवेश करण्याची शक्यता आहे.

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights