ब्रेकिंग न्यूज
रवि. डिसेंबर 22nd, 2024

शिंदे अन पवारांना निशस्र केल तर आणि तरच भाजप १०५ वर टिकेल किवा सत्तेच्या जवळ पोहचता येईल अन्यथा ….

युती

युती

असं म्हणतात कि ,राजकारणात कोणी कोणाचा दीर्घकाळ शत्रू  किवा मित्र असत नाही .तसच  सोबत असणारे एकमेकांबद्दल स्वच्छ भावनेने असतात असेही नाही .त्यांच्यातही आतल्याआत  अस्तित्वाची लढाई सुरूच असते . त्यामुळे एकमेकांबद्दल कुरघोड्या ,शह ,कटशहाचे राजकारण सुरूच असते .मी माझा गट कसा सोबत असणार्यापेक्षा सरस राहील यासाठी कुठ्नितीचे डाव सुरूच असतात .जागावाटपातला  दावा ,प्रतिदावा करून आपल्या पदरात जास्तीचे माप कसे पडेल यासाठी आपसात ओढाताण सुरूच असते .यात जो गट ,ज्या गटाचा नेता बुद्धी कौशल्याने सोबतच्या गटाच्या कमकुवत बाजूचा आधार घेवून सातत्याने त्यांच्यात भीती  निर्माण करून तुम्हाला कस अशक्य आहे हे बिंबवण्यात यशस्वी होतो .  त्या गटाची सरशी होते .अन जर तेही कमी आले नाही तर त्या गटाच्या ह्या कमकुवत बाजूंची रसद विरोधकांना पुरवून या गटाला  सक्रीय राजकारणातून कसे रोखता येईल यासाठी आपले  वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून  टोकाची विव्हनिती अवलंबवायलाही मागे पुढ पाहत नाही .अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या कुटनितीलाच खरे राजकारण म्हणत असावेत .

सध्या राज्यात महायुती व महाआघाडी या दोघ आघाड्यांमध्ये सध्या मोठा भाऊ ,छोटा भाऊ ,आपलाच  मुख्यमंत्री होणार ,आम्हीच सरस ,आम्हाला इतक्या जागा हव्यात ,आमच्यामुळे तुम्ही या मुद्यांना उत आलाय .तर भाजपात या साऱ्या  गोष्टींच गांभीर्याने विचार मंथन सुरु असल्याचे समजते .जागावाटपातली डोकेदुखी ,मुख्यमंत्री पदाचा मुद्दा ,या गोष्टी भाजपसाठी चिंतेच्या ठरल्या आहेत .आपण सगळा खटाटोप केला ,सोबतच्याना सत्तेचा बहुमान दिला , मुख्यमंत्री पदाचा छातीवर दगड ठेवून त्याग केला ,अन  तरीही अपेक्षित जागा  पदरात पडत नसतील ,भविष्यात मुख्यमंत्री पद पुन्हा जर तर च ठरणार असेल अन पुन्हा आयत्या पिठावर नागोबाच सजणार असेल  तर भाजपाने कमावल काय ? असा प्रश्न आता भाजप नेतृत्वांपुढे उभा राहिला आहे .

भ्रष्टाचाराचे आरोप करून ज्यांच्या विरोधात रान उठविले त्यानाच आश्रय देवून भाजपाने त्यांना  बहुमानही दिला .त्यामुळे भाजपची प्रतिमा डागाळली.कुणी कुणाच्या ताटाखालच मांजर झाल  याच आत्मपरीक्षण करताना अस वाटत या पेक्षा उद्धव  ठाकरेंना अडीच वर्ष  मुख्यमंत्री देणे कधीही भाजपसाठी चांगले ठरले असते .शेवटी  बदनामी पदरात पाडून सेनेला पाच वर्ष मुख्यमंत्री पद दिलंच ना !  अशा  भावना  कार्यकर्त्यांमध्येही व्यक्त होताना दिसतात  .अर्थात याची  जाणीव वरिष्ठ नेतृत्वाना स्थानिक नेते देखील करून देत असावेत .त्यामुळेच  वरिष्ठ नेते देखील भविष्यातली रणनीती ठरविताना अस्तित्वाच्या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करून पावुले टाकत  असल्याची व वेळप्रसंगी कठोर निर्णय घेणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे  .पवार व शिंदे गटाची क्षमतेपेक्षा अधिक जागांची मागणी ,त्यासाठीची ओढाताण ,संघर्ष ,लाचारी या गोष्टी भाजपसाठी ,पक्षाच्या अस्तित्वासाठी चिंतेची बाब नक्कीच ठरली असावी  .ताणल तर तुटू नये ,सोडलं तर पळू नये .याची तमा न बाळगता या पलीकडच समीकरण भाजप आखत असल्याच समजत .ज्यामुळे तुटण्याची अन पळण्याची भीती तर सोडा या दोघही भीती आपल्या कशा दास होतील याची विव्हनिती आखली जात असल्याचे समजते .

जागा वाटपात मन भरत नाही ,मुख्यमंत्री कोण हे ठरत नाही  हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा ….तेव्हा मात्र भाजपापुढे  पवार आणि शिंदे गटाला निशस्र केल्याशिवाय पर्याय असणार नाही या अंतिम मुद्यावर सध्या खल चालू असल्याचे समजते .याचा अर्थ निवडणुकी आधी शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे चिन्ह गोठवून ते पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोपविण्याचा निर्णय न्यायालयाचा लागला तर नवल वाटायला नको .तेव्हा ” ना रहेगा बास ,ना बजेगी बासरी ” मग दोघंही भीती पडतील भाजपच्या ओसरी . ना जागांची ओढाताण ,ना मुख्यमंत्री पदासाठी छातीवर दगड ठेवायची आफत .ना तुटायची भीती ,ना पळायची भीती . मग भाजपच्या दास बनतील या दोघंही भीती . तर आणि तरच भाजपला अस्तित्व टिकवून ठेवता येईल अन्यथा महायुतीच्या लफड्यात भाजप ६0 किवा ६५ वरच सीमित राहील अशी भीती भाजपच्याच अंतर्गत सर्वेत दिसून आल्याची  चर्चा आहे . देखते है  आगे आगे होता ही क्या ?

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights