ब्रेकिंग न्यूज
रवि. डिसेंबर 22nd, 2024

शेतकऱ्यांचा कैवारी उन्मेष पाटलांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातून हजारो शेतकरी देणार योगदान !

उन्मेष पाटील
जळगांव – प्रश्न शेतकऱ्यांचा पिकविम्याचा असो की, पोखरा अनुदानाचा, प्रश्न बचत गटांच्या माध्यमातून महिला बळकटीकरणाचा असो की,
युवा उद्योजकांचा, प्रश्न रेल्वे सुविधांचा असो की, वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा, प्रश्न कृषी योजनांचा असो की, निन्म तापी पाडळसरे धरणाचा, प्रश्न माता बाल संगोपन अंतर्गत 100 बेडच्या रुग्णालयाचा असो की,कामगारांच्या 100 बेड रुग्णालयाचा, प्रश्न पीडित रुग्णांना मदत मिळवून देण्याचा असो की, दिव्यांग बांधवांना साहित्य मिळवून देण्याचा, प्रश्न अटल भूजल योजनेचा असो की, किसान सन्मान योजनेचा असो, प्रश्न रेल्वे उड्डाण पुलांचा असो की, मातृ वंदना योजनेचा असो, प्रश्न सात बलूनचा असो की, राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा असो , प्रश्न आवास योजनेचा असो की, रुबरन योजनेचा , प्रश्न ग्राम सडक योजनेचा असो की, पर्यटन विकासाचा, प्रश्न जलासंधरण योजनेचा असो की, कांदाचाळ, शेततळ्यांचा , प्रश्न फलोत्पादनचा असो की, सिंचाई योजनेचा, प्रश्न सौर कृषी पंपाचा असो की, ग्रामीण विद्युतीकरनाचा, प्रश्न मूलभूत सुविधांचा असो की, नावीन्यपूर्ण योजनेचा अशा असंख्य यासारख्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करुन त्यांची प्रामाणिकपणे सोडवणूक करण्यासाठी खासदार असतांना  उन्मेश पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अन् त्याचच घोतक म्हणुन ते भारतात टॉप टेन खासदारांमध्ये आले होते  ज्यामुळे मतदार संघाचा स्वाभिमान देखील दिल्ली दरबारात उंचावला होता .त्यांच्या पिक विमा संदर्भातल्या कामगिरीने शेतकऱ्यांच्या हृदयाचा ठाव घेतला अन् शेतकऱ्यांचा वाली म्हणुन ते “विमावाले दादा”ठरले. निधी खर्च करण्यात राज्यात पाहिले खासदार म्हणूनही ते अव्वल ठरले. “शासकीय योजनांची जत्रा “ह्या त्यांच्या उन्मेश पॅटर्नचा तर राज्य सरकारलाही हेवा वाटला अन् राज्य सरकारने हा उपक्रम अख्या महाराष्ट्रभर राबविला. तरी.. तरी… देखील उन्मेष पाटलांवर  पक्षाने अन्याय केला त्याची सल शेतकऱ्यांना आहे .अशा या शेतकऱ्यांच्या कैवारीसाठी जिल्ह्यातील हजारो शेतकरी त्यांच्या प्रचारासाठी चाळीसगाव तालुक्यात आपले योगदान देणार असल्याचे असंख्य फोन उन्मेष पाटील यांना शेतकऱ्यांचे येत आहेत .
उन्मेष पाटील यांनी कुणाचे उनेदूने न काढता, आरोप प्रत्यारोपांच्या भानगडीत न पडता फक्त आणी फक्त  सरकारच्या योजना शेतकऱ्यांच्या पदरात कश्या पडतील या साठीच सातत्याने झटत असतात  . हा माणूस कधी कुठल्या कार्यक्रमात वादातीत विषयांवर बोलताना दिसला नाही.जळगाव लोकसभेचा खासदार या नात्याने काम करत असताना 20 % टक्के  राजकारण अन् 80% समाजकारण या तत्त्वाने सातत्यानं खासदार उमेश पाटील यांनी काम करण्याचा प्रयत्न केला.समाजाच्या प्रत्येक घटकाच्या प्रश्नावर पोटचिडकीने संसदेत आपली भूमिका मांडताना जनतेने पाहिले आहे.मात्र आज भारतीय जनता पार्टीमध्ये 80 टक्के राजकारण झालं अन् 20 टक्के समाजकारण. हे उन्मेश  पाटील यांच्यावर अन्याय करून  सिद्ध झाले असल्याचं शेतकऱ्यांच  म्हणण आहे.कदाचित उन्मेश पाटील यांनी देखिल शेतकऱ्यांना समृद्ध करणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कुटील नितीच 80 टक्के राजकारण अन् देखलेपणाच 20 टक्के समाजकारण केल असत तर ते देखील ८ ते १० कोटींचा बंगला आणि हजारो कोटींच्या मालमत्तेचे धनी बनू शकले असते भाड्याच्या घरात राहिले नसते .परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून माझा बळीराजा हलाखीचे जीवन जगात असतांना आपण एशोआरामात जीवन जगाव हे निर्दयीपनाच धोरण त्यांना मुळीच मान्य नव्हत .
  आमदार असतांना दरेगाव लोंढे प्रकल्प अवघ्या पाच वर्षांत पुर्ण करुन चाळीसगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठीची सिंचन क्रांती करुन शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. तिच तळमळ जळगांव लोकसभा क्षेत्रातील गीरणा आणि तापी पट्ट्यातील संपूर्ण शेती ओलिताखाली येवून माझ्या शेतकऱ्याला गत वैभव प्राप्त व्हावं म्हणुन सात बलूनबंधारे ही संकल्पना अन् निन्म तापी पाडलसरे प्रकल्प पुर्ण करण्याचं स्वप्न  उन्मेश पाटील यांच होत. अन् कदाचित हेच स्वप्न त्यांच्या उमेदवारी कापण्याच कारण ठरलं की काय असा प्रश्न आता जाणकारांना पडला आहे. कारण गुजरातला जाणारे पाणी अडवणारे प्रकल्प मोदी शहांची जोडी सत्तेत असे पर्यंत तरी कधीच पूर्णत्वास येणार नाहीत अशी साशंकता आता जानकारांमध्ये निर्माण होवू लागली आहे. अर्थात याला पुष्टी देताना जाणकार असेही सांगतात की,  गिरीश महाजन यांच्यासारख्या संकट मोचकाने मागच्या काळात जलसांधरण मंत्री असताना एक वीट रचण्याच्य धाडस निन्म तापी पाडलसरे प्रकल्पवर केलं नाही. ते धाडस  सातत्याने उन्मेश पाटील शासन दरबारी करत राहीले. पाच वर्षात दरेगाव लोंढे प्रकल्पाचं पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत घेवून जाण्याची दानत कुणाची झाली नाही .त्यामुळे आपली निष्क्रियता झाकण्यासाठी षडयंत्र रचली गेलीत .दुसऱ्यांच सोडा जो माणूस उन्मेष पाटील यांच्या ताटात जेवला त्याने देखील उन्मेष पाटील यांच्या ताटात घाणच  केली हि सर्वात क्लेशदायक बाब ठरली .अशा निधर्मी माणसाला धडा शिकविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उन्मेष पाटलांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका घेत असतील तर शेतकऱ्यांचा हा निर्णय नक्कीच अभिमानास्पद आहे . शेतकरी समृद्ध व्हावा, इथल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला काम मिळावं अशी मानसिकता सध्यातरी मोदी शहांची दिसत नाही  म्हणूनच महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी, अन् इथले रोजगार गुजरातला पळविले गेले .
पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाईची रक्कम देत नाही. शेतकरी अडचणीत आला आहे. याचं दुःख खासदार उन्मेश पाटील यांना सातत्याने बोचत होत. अन् म्हणुन त्यासंदर्भात ते सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहत असत. नाठाळ पिक विमा कंपन्याना वठणीवर आणण्यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी स्वतः औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली होती . या ध्येयवेड्या माणसाच्या हे कधीच लक्षात आले नाही की गुजरातला जाणारे पाणी अडविनारे प्रकल्प,अन् कुणाच्या तरी राजकिय नेत्याची हित संबंधितांची वीमा कंपनी विरोधात आपण लढतो आहोत. या ध्येय वेड्या माणसाला फक्त एवढंच माहीत होत की, मी माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतो आहे. अन् हेच लढण कदाचित वरिष्ठांचे दुखण ठरल .अन  उन्मेश पाटील पुन्हा खासदार झाल्यावर मंत्री होतील अन् आपला दरबार रिकामा होईल, आपलं आसन डळमळीत होण्याच्या  भीतीनं प्रस्थापित नेत्यानेही  उन्मेश पाटील यांना राजकारणापासून दूर सारण्यासाठी प्रयत्न केले . सातत्यानं मराठा समाजाच्या उभरत्या नेतृत्वाच खच्चीकरण समाजाताल्याच बुच्या बांड्याला  हाताशी धरून
एका विशिष्ठ नेत्याकडून  केलं जात असल्याची संतापजनक भावना मराठा समाजामध्ये आता व्यक्त होवू लागली आहे .
असं म्हणतात की,कुत्र्याला खीर पचत नाही. चोराची चोरी छुपत नाही, गाढवाला फुलहार शोबत नाही, आणि हरामाच कधीच कुणाला पचल नाही. पाप हे पापच असतं, चोरी करणाऱ्याला चोरच म्हणतात, लचके तोडणाऱ्याला कुत्रच म्हणतात, तर लाथा मारणाऱ्याला गाढव, आणि दुसऱ्याच्या ताटात जेवून त्याच ताटात जो घाण करतो त्याला हरामी , गद्दार म्हणतात आणि ह्या सगळया गुणांचा ज्यात संगम दिसतो त्याला हैवान म्हणतात.अशा हैवानांची पिलावळ सध्या राजकारणात मोठया प्रमाणावर वाढीस लागत आहे. अशा विश्वासघातकी, दगाबाज अवलादी जनतेच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेवून वेगवेगळी अमिषे दाखवुन सातत्यानं बुद्धीभेद करून जनतेच्या भावनांची तस्करी करतात.जे सर्वात घातक आहे. सर्वाधिक वाईट गोष्ट म्हणजे अशी लोकं लाखों लोकांच्या बरबादीस कारणीभूत ठरतात.अशाच निधर्मी ,दृष्ट प्रवावृत्तीला गाडण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्याने उन्मेष पाटील यांच्या मदतीला शेतकरी धावून जात आहेत .
सध्याच्या  राजकारणात दृष्ट प्रवावृत्तीच्या  अवलादी समाज व्यवस्थेचा कणा असलेल्या संस्कृती, संस्कार, मान मर्यादा, न्याय, निती, धर्म यावरच घाला घालू लागल्याने चोर शिरजोर होत आहेत आणि जनता कमजोर होतेय. अशा अवलादीना सत्ता संपत्तीचा इतका माज चढलाय की, त्यांनी दबावतंत्र,  गुंडगिरीच्या जोरावर जनतेची मन दहशत व भीतीच्या अश्राने इतकी कैद केली आहे. की अन्याय, अत्याचार विरुद्ध आवाज उठविन्याची कुणाची हिम्मत होत नाही.
अर्थात शेवटी अती झालं की , भगवत गीतेत म्हटल्याप्रमाणे

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥

 जेव्हा जेव्हा अन्याय्य, अत्याचाराची परिसीमा होते त्या त्या वेळेला कुणाच्या अन कुणाच्या तरी रूपाने अश्या प्रवृत्ती विरुद्ध लढण्यासाठी लढवय्या परमेश्वर निर्माण करतो.
आज कोणत्याही नेत्याची ज्या मुजोर नेत्यावर बोलण्याची,त्याच्या मुजोरशाहिविरुद्ध आवाज उठविण्याची, त्याला जाब विचारण्याची हिम्मत होत नव्हती. त्याच्या विरुद्ध आवाज उठविण्याची, त्याला जाब विचारण्याची हिम्मत,त्याच्या पिलावळीला आव्हान देण्याची हिंमत असलेला शेतकऱ्यांचा कैवारी,सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं लढणारा स्वाभिमानी नेता म्हणुन  माजी खासदार उन्मेश पाटील यांनी आपली छबी निर्माण केली आहे. ते खंबीरपणे मुजोरशाही विरूद्ध लढत आहेत. उन्मेष पाटील यांच्या ताटात ज्यांनी खाल्ल आणि त्याच ताटात ज्या निधर्मी माणसाने घाण केली अशा निच प्रवृत्तीला गाडण्यासाठी ते धाडसाने लढाही देत आहेत.नव्हे तर जनताही तितक्याच जोमाने त्यांच्या पाठीमागे उभी राहत प्रतिसाद देत आहे .चाळीसगाव तालुक्यातील जनतेला एकच गोष्ट खटकली ,ती  म्हणजे कोणी कोणाला नडत नसताना ,जो तो त्याच्या त्याच्या जागेवर बरोबर असतांना चाळीसगावकरांच्या खासदारकीचा बहुमान हिरावून घेण्याच पाप जे केल गेल  ते चाळीसगाव तालुक्यातील जनतेला मुळीच पटलेलं नाही .त्यामुळे अशा दृष्ट प्रवावृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे या मानाशिकतेत सध्या तरी  चाळीसगाव तालुक्यातील जनता दिसत आहे .
एकमेव आहेत  दादा
शेतकऱ्यांचे वाली!
षडयंत्रिनी रचिला डाव
 पाय खेचले  खाली!
उठा पेटूनी शेतकऱ्यांनो
 अन्यायाची सिमा जाहली!
पेटविण्या दृष्ट प्रववृत्तीस
 आता पेटवा मशाली !
आता पेटवा मशाली!

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights