ब्रेकिंग न्यूज
रवि. डिसेंबर 22nd, 2024

कामे केली, उपकार नव्हे ! कर्तव्य असतं! गोट्या भवरे खेळण्यासाठी तर मुळीच निवडूण दिलं नसतं! मलिदा किती कमावला हे कधी सांगत नसतं! गबाळाना म्हणावं जनता लई हुशार त्यांना सारं काही कळत असतं!

असं म्हणतात की, एखाद्या बलाढ्य नेतृत्वाच्या बळावर अथवा घराणेशाहीच्या परंपरेनं उदयास आलेले नेतृत्व माजाटलेपण  प्रकट करतं. तर सर्व सामान्य जनतेच्या आशिर्वादाचे बळावर उदयास आलेल नेतृत्व नम्रता अन् करूनेन सजलेलं असतं. नेतृत्वाची प्रभावाने नव्हे तर स्वभावाने निर्माण झालेली ओळख जनतेला आधिक भावते. परंतु काहींकडे बुद्धीभेदाची गोळी अन दिशाभूलच इंजेक्शन देण्याच कौशल्य असत . ज्यामुळे ते तत्काळ  झोपडीतून महालात आणि खोपडीतून गुढघ्यातही येतात .

जे नेतृत्व आपली मागची पार्श्वभूमीची जाणीव ठेवून मातीशी नाळ जुळवून वाटचाल करते ते सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवते. अन जे मागची पार्श्वभूमी विसरतात व कुणाच्या तरी मेहेरबानीने अल्पावधीत ज्यांना पद , प्रतिष्ठा मिळते असे नेतृत्व “ग” च्या बाधेने व्याधीग्रस्त होतात. अर्थात त्यांचेकडे बघताना सर्वसामान्य जनता ही संकुचित अन् अपराधी भावनेनेच पाहते. परंतु  अशा नेतृत्वाना चूक करतानाही अभिमान वाटतो. अशी  बौद्धिक अपंगत्व असलेली  नेतृत्व दुसऱ्यांच्या चुका अशा आविर्भावात मांडतात की आपण कीती धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत. अर्थात कोण किती पाण्यात आहे , हे जनतेला पुरतं माहीत असत. कारण  अशांना नेतृत्व म्हणूण याच जनतेने जन्माला घातलेलं असतं.

काही नेतृत्व अशीही आसतात अनवधानानेही झालेली चूक मोठ्या मनाने स्वीकारतात. त्यात भविश्यात दुरुस्ती करुन पुन्हा ती होणार नाही याची काळजी घेतात .आपल्यापेक्षा लहान असलेल्यांचा देखील सन्मान राखतात .वडीलधार्यांचा उपमर्द होणार नाही याची काळजी घेतात .कारण ते  संस्कृती आणि संस्काराचे पायिक असतात .  व आपली मातीशी नाळ जुळवून ठेवत वाटचाल करतात.सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटतात.त्यांच्या समस्या, प्रश्नांना प्राधान्य देवुन त्यांची सोडवणूक कारण्यातच ते धन्यता मानतात.

असच एक नेतृत्व अशा तालुक्यात जन्माला आल. की, ज्या तालुक्याच्या नावातच सामुदायिक पद्धतीने सर्वांना एकासाथ सोबत घेवुन चालण्याचा ,एकजुटीचा संदेश मिळतो. अशा या चाळीसगांव तालुक्यात तरुण, होतकरू, उच्च शिक्षित,सर्वसामान्यांची जान असणारे , आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकासाचा ध्यास, प्रचंड अभ्यास असलेले नेतृत्व उदयास आले ते म्हणजे उन्मेश भैयासाहेब पाटील.

राजकारण म्हणजे गनिमी आयुधानी सजलेलं रणांगण!

तसं सध्याच्या काळात राजकरण म्हटलं म्हणजे आरोप, प्रत्यारोप,कुरघोडी, शह,कटशह या गनिमी आयुधानी सजलेलं रणांगण.राजे महाराजांच्या काळात शत्रूचे लढता लढता शस्त्र तुटले तर निशस्त्र शत्रू बरोबर लढायचे नाही . कारण ते अमर्दांगीच ठरेल म्हणून त्याला आपल्या जवळील शिल्लक असलेले शस्त्र देवुन सामना करण्याच्या मर्दांगीचे तत्व महाराणा प्रतापांसह त्याकाळच्या राजांचे होते.

आज परिस्थिती उलट आहे. एखाद्याचे शस्त्र (पद) घालवायचे(त्याला निशस्त्र करायचे) अन् मग त्यावर आपल्याकडे ऊपलब्ध असलेल्या सर्वप्रकारच्या (शासकीय यंत्रणा) आयुधांचा मारा करुन संपवायचे असे अमर्दांगीचे युद्ध लढणारी नपुसक प्रवृत्ती जोमाने वाढीस लागली आहे.

खरं दुसऱ्याचा खांदा तिसऱ्याचा घात करण्यासाठी नव्हे, अन दुसऱ्याला मारलेली मिठी तिसऱ्याच्या वाईटाचा आनंद व्यक्त करण्यासाठीही नव्हे .तर आपण स्वतःच्या खांद्यावर डोके टेकून *रडू* शकत नाही , अन
स्वतःच स्वतःला आनंदाने *मिठी* ही मारू शकत नाही______ ! म्हणून त्याचं निर्माल्य आहे.
स्वतःच्या दुःखाचा भार हलका करण्यासाठी , तो भार उदार मनाने सोसून दिलासा देणारा
खांदा, अन दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्याकरिता मिठी मारण्यासाठी उच्छुकतेने वाट पाहणार हृदय जिंकण  हा पूर्वजांनी घालून दिलेल्या उच्चतम कोटीच्या संस्कार आणि संस्कृतीचा पाया आहे . जीवनाच सार आहे.खऱ्या आपुलकीचा सदाचार आहे. शुद्ध अंतकरणाचा भाव आहे. या विचारानेच चालण्याचा प्रयत्न उन्मेश पाटील यांचा सातत्यानं दिसून येतो.

अर्थात अशी नेतृत्व जेव्हा आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जनमानसात अधिक लोकप्रिय होत असतात तेव्हां अशाही नेतृत्वाचे पाय खेचनाऱ्या खेकड्याच्या औलादिंचीही राजकारणात,समाजकारणात काही कमी नाही.उभा देश विशेषता महाराष्ट्र गेल्या काही महिन्यांपासून सुरु  असलेल्या अतिशय खालच्या दर्जाच्या राजकारणाचे चित्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे .

उन्मेश पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी खरं तर त्यांच्या कामाचा आदर्श घेवुन जरासि का होईना तुलना करुन दाखविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे . मग ते शासकीय योजनांचा अभ्यास असो की शेतकऱ्यांना आपल्या हक्काची पिक विम्याची रक्कम मिळवून देणे असो. पाच वर्षात धरण पूर्ण करणे असो की, शासकीय योजना शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्याचा देश पातळीचा विक्रम असो. मतदार संघाचे प्रश्न संसदेत सातत्यानं मांडून टॉप 10 मध्ये येवून मतदार संघाचा अभिमान उंचवणारी बाब असो की, बचत गटांच्या बळकटीसाठी प्रयत्न करणे असो. जळगांवला वैमानिक प्रशिक्षण केंद्र खेचून आणणे असो की, देशातील मोजक्या मतदार संघापैकी आपल्या मतदार संघात तब्बल 4 रेल्वेचे अमृत स्टेशनला मंजुरी मिळविणे असो., गीरणेची 450 किमीची 45 डिग्री तापमानात पायी परिक्रमा करणे  असो की, निन्म तापी,7 बलून बंधारे, नार पार प्रकल्पासाठी सातत्यानं पाठपुरावा करणे असो. एकदा नव्हे दोनदा मित्रांसाठी  स्वतःच राजकीय करिअर बाजुला ठेवून पदाचा त्याग आणि समर्पणाची भावना जोपासणे असो की ,वडीलधार्यांचा सन्मान राखण असो .  

राजकारणात नुसतच बोलबच्चन असून चालत नाही त्यासाठी अभ्यास अन् त्याच्या जोरावर कर्तृत्वाची शिद्धी महत्त्वाची ठरते.अभ्यासू अन् अभ्यासू नेतृत्वाचा तालुक्याच्या विकासात किती फरक पडतो याचा प्रत्यय सध्या जिल्ह्यातल्या जनतेला दिसून येत आहे. राजकारणातल अनपड असणं वेगळं पण मानसिकताच नसणं फार वाईट . कारण राज्याच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत की, ज्यांनी त्यावरही मात करून प्रत्येक योजना, समस्या यांच्या मुळापर्यंत जावून, त्याचे मर्म जाणून घेवुन अभ्यासुलाही लाजवेल अशी कारकीर्द कमी शिक्षित लोकांनी राजकारणात केलीय. मात्र त्यातही काही जण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ पाहताना स्वतच्या डोळ्यातील मुसळ बाजूला न सारता त्याला बगल देत जनतेचा बुद्धिभेद करुन दिशाभुल करण्यात माहीर आसतात.

 अवघ्या आमदारकीच्या पाच वर्षांत एक आमदार काय करू शकतो. याची जिल्ह्यातच अनेक उदाहरणे आहेत. मग ते राज्याचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे ,माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, गुलाबराव देवकर, उन्मेश पाटील यासारखी नेतृत्व उदाहरणा दाखल देता येतील . त्यात माजी खासदार उन्मेश पाटील यांची मागील आमदारकीची अवघी पाच वर्षे चाळीसगांव तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लीहावी अशी नक्कीच ठरली आहेत.

सामान्य कुटुंबात जन्मलेल्या चिकित्सक, जिज्ञासू, होतकरू व केमिकल इंजिनिअर असल्याने एखाद्या विषयाच्या खोलात जावून त्याचा मतितार्थ निघेपर्यंत प्रयत्नशील राहणे हा या नव्या दमाच्या नेतृत्वाचा स्वभाव. तस पाहिलं तर चाळीसगांव तालुका डोंगर कपारी निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला तालुका, शून्याचा शोध लावणाऱ्या गणिती तज्ञ भास्कराचार्य,जगप्रसिद्ध छायाचित्रकार के के मुस यांच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध असलेला तालुका. इतकंच नव्हे तर ऋषिपांथा, वालझिरी, पाटणा देवी, सायगाव बगळी देवी, सिद्धेश्वर आश्रम या धार्मिक स्थळानी नाव लौकीक लाभलेला तालुका. तरी देखिल विकासापासून वंचित का? हा प्रश्न नेहमी सतावत होता

.बेलगंगा साखर कारखान्याच्या प्रश्नासह प्रत्येक प्रश्नासाठी उन्मेश पाटील यांचा संघर्ष सूरू राहिला. अल्पावधीत ह्या नेतृत्वाने जनतेच्या मनामध्ये आपुलकीचा जिव्हाळा निर्माण केला.  भारतीय जनता पक्षाच्या वरच्या फळीच्या नेतृत्वानीअचूक संधी हेरत उन्मेष पाटील यांना आमदारकीची उमेदवारी दिली.मोठ्या मताधिक्याने ते निवडूनही आले. त्या संधीचे सोने करण्याचा निश्चय करून उन्मेश पाटील यांनी कामाला सुरुवात केली. प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्यासाठी सज्ज झालेल्या या नेतृत्वाने धार्मिक आणि एतीहासिक स्थळांच्या पुनर्जीवणासाठी कोट्यवधींचा निधी मिळवला. त्यातून पर्यटनाला चालना व तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं.क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुलेयांच्या नावाने तालुक्यांतील जनतेचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृती सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका व संघटित व्हा या तत्त्वानुसार नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी 12 कोटीचा निधी, MIDC मध्ये 1000 कोटीहून अधिक गुंतवणुकीचे प्रकल्प साकारून हजारो तरुणांच्या हाताला काम मिळाले . तांडा वस्त्यांच्या विकासासाठी प्रशासनाशी सुसंवाद साधून तालुक्यांतील शेकडो प्रश्न मार्गी लावण्यासाठी कौशल्य पणाला लावले.शासकीय योजनांची जत्रा हा उन्मेष पाटील यांचा प्याटर्न तर राज्य सरकारला प्रेरणादायी ठरला. सरकारने हा उपक्रम राज्यभर राबविला देखील . 

नगरपालिकेत सत्तातर घडवून चाळिसगाव शहरात अंतर्गत रस्ते, भव्यदिव्य पाणीपुरवठा योजना, 1 कोटी 84 लाखाचे भव्य इनडोअर स्टेडियम, चौक सुशोभीकरण,घनकचरा व्यवस्थापन, घंटा गाड्या,led पथदिवे आदी कामानी शहर फुलविले. त्याच बरोबर सुसज्ज बस स्थानक, अनेक वर्षापासून रखडलेला वरखेड लोंढे प्रकल्प, शासकिय योजनांची जत्रा, राज्यात सर्वाधिक चाळिसगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना गायगोठा शेड उपलब्ध करुन देवुन देशात अव्वल ठरून ठसा उमटवला. जलयुक्त शिवारची सर्वाधिक कामे,  शेततळी, बोंड अळी व गारपीठ ग्रस्तांना भरीव मदत, कांदा चाळ, शेतीपूरक औजारे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून देण्यात विभागात पहिला क्रमांक पटकावला. जळगांव मनमाड 3री लाईन, अनेक एक्स्प्रेसला थांबा. जळगांव चांदवड रस्ता काँक्रीटीकरण, येवला एरंडोल मार्गाचे पुनर्जीवन, धुळे रेल्वे लाईन विद्युतीकरण, कन्नड घाटातल्या बोगाद्याचे सर्वेक्षण अशी शेकडो कामे की जी वर्षानुवर्ष जनतेच्या स्मरणात राहतील अशी कामे त्यांनी केली.

शेकडो कोटींच्या कामाचा पाठपुरावा करून मतदार संघ फुलविला. सिंचनाने शेती फुलेल, रस्ते आणि रेल्वेच्या जाळ्याने बाजारपेठा फुलतील, अन् शेती आणि शेतकरी यांना सुगीचे दिवस येतील या जाणिवेतून त्यांनी पाणी या प्रस्नाला प्राधान्य दिले आहे. जळगांव लोकसभा मतदार संघातून वाहणारी गीरणा नदीचे संगोपन अन् त्यावर 7 बलून बंधाऱ्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा  सुरु आहे. त्या अनुषंगाने गिरणा काठावरच्या गावांना गिरना पारिक्रमेच्या माध्यमातून भेटी देऊन जनजागरण मोहीम हाती घेतली होती . त्यातून गिरणेचे संगोपन, काठावरील गावाना पाणलोट क्षेत्र विकासाचे महत्त्व व काळाची गरज याचे महत्त्व समजावून त्यातून करावयाचे सामुदायिक प्रयत्न यासंदर्भात जनजागृती केली . त्यात जनतेच्या सहभागाने पाणलोटाची कामे, वृक्ष व बांबू लागवड, रोजगार स्वयंरोजगार शिबिर, कौशल्य विकास व प्रशिक्षण, महिलांना स्वयंरोजगार विषयी मार्गदर्शन शिबिर,शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता व हवामान बदलावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करावयाची शेती या संदर्भात मार्गदर्शन शिबिरे देखील घेतली .

खासदार उन्मेश पाटील हे नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी तत्पर असतात. वेळोवेळी आमदार असताना विधानसभेत तर खासदार असताना लोकसभेत आवाज उठविताना आपण पाहिलं.आमदाराचे खासदार झाल्यावर देखील कधी पदाची नशा,उर्मी दिसली नाही.जमिनीशी नात जुळवून ठेवत हा माणूस आमदाराचा खासदार झाला तरीही भड्याच्याच घरात आहे असं उदाहरण राज्यात तरी एकमेव असावं. 

    ————————————-

खूप मोठी कामे करूनही उन्मेष पाटील यांनी कधी उपकाराची भाषा किंवा त्याचा बावू केला नाही.ते नेहमी असं म्हणतात की, जनता आपल्याला कामे करण्यासाठीच निवडूण देते. गोटया भवरे खेळण्यासाठी नव्हे. किंवा कामे केली म्हणजे उपकार नाही तर ते आपले कर्तव्य असते.

     ———————————-

एकीकडे उन्मेश पाटील यांच्या सारखं नेतृत्व तर दूसरीकडे आमदार झाल्याझाल्या 8 ते 10 कोटींचा बंगला अन हजारों कोटींच्या प्रॉपर्टी कमावणार नेतृत्व हा एव्हढा मोठा जमीन अस्मानाचा फरक दाखविणारे उदाहरण चाळीसगाव सोडून इतर कूठे दुसऱ्या ठिकाणी नाही तर याच तालुक्यातील जनतेला अनुभवायला मिळत  आहे. हे विशेष.

या तालुक्यात देशमुख घराणे पिढ्यान् पिढ्या राजकारणात आहे, प्रा साहेबराव घोडे दोन टर्म आमदार राहिले, डी डी चव्हाण मंत्री राहिले, ईश्वर जाधव आमदार राहिले, उन्मेष पाटील आमदाराचे खासदारही झाले अशी अनेक बुद्धिवान लोक राजकारणात होती आहेतही परंतू इतक्या फटक्यात त्यांच्यापैकी कुणालाही हजारो कोटींची माया जमविताना चाळीसगांवकराणा कधी पाहायला मिळाले नाही.कारण ज्याच्याकडे बुद्धिभेदाची गोळी अन दिशाभूलच इंजेक्शन देण्याचं कौशल्य असेल तो अल्पावधीतच झोपडीतून महालात आणि खोपडीतून गुढघ्यात येवू शकतो. त्याच हे ज्वलंत उदाहरण सध्या चाळीसगांव तालुक्याची जनता अन्अउभवत आहे . अशी लोकं जेव्हा खोपडीतून गुढग्यात येतात तेव्हा त्यांची वाऱ्यावरची वरात खोक्याने सजते. भावनांच्या निखाऱ्यावर 7 फेरे घालते. आणि ज्या कार्यकर्ते व जनतेमुळे  हे वैभव त्याला लाभते त्यांना ते झुलवत राहते. तेव्हाच खरं तर त्यांची राजकीय संसारवेल फुलत राहते. त्यासाठी चाळीसगावकरांनो उघडा डोळे !राहू नका भोळे !

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights