ब्रेकिंग न्यूज
रवि. जानेवारी 12th, 2025

“रात्रीस खेळ चाले”दया कुछ तो गडबड है !दालमें कुछ काला नही पुरी दालही काली है!

रुपाली ठोंबरे

रुपाली ठोंबरे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या विविध पक्षांतर्गत धुसफूस समोर येत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटातील महिला नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. पुण्यातील अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यामध्ये राजकीय चढाओढ सुरु आहे. एकाच महिला नेत्याला किती जबाबदारी देणार आणि किती संधी देणार असा सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे. त्यावरुनच सध्या अजित पवार गटात अंतर्गत वाद सुरु आहेत.

रुपाली चाकणकर यांना काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. यामुळे रुपाली पाटील ठोंबरे या नाराज झाल्या. रुपाली चाकणकर यांना पक्षातूनच विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एक व्यक्ती एक पद नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी मला मी बाहेरची असल्याचे म्हटले. त्याने मला हर्ट झालं आहे. मी जर बाहरेची असेल तर मी बाहेरच जाते. मात्र दादा मला बोलले की मी तुम्हाला पक्षप्रवेश दिला आहे त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले होते.

रुपाली पाटील ठोंबरेंची फेसबुक पोस्ट

यानंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी अप्रत्यक्षरित्या रुपाली चाकणकरांना टोला लगावला आहे. तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा…? दया_कुछ_तो_गडबड_है अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.

बाई काय हा प्रकार… किती वेळा तेच ते.. “रात्रीस खेळ चाले” ची एवढी बजबजपुरी  झाल्यानंतर मालिका बंद होईल असं वाटलं होतं… पण छेss निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!! तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा…? #दया_कुछ_तो_गडबड_है #दालमें_कुछ_काला_नही_पुरी_दालही_काली_है_भाई, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी नक्की हा टोला कोणाला लगावला, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

एकाच महिलेला किती संधी देणार?

दरम्यान अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे या गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर आणि पक्षश्रेष्ठी अजित पवार यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद देखील आहे. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या देखील त्या अध्यक्षा आहे. तरी देखील आता रुपाली चाकणकर यांना इतर पद दिली जात आहेत. त्यामुळेच रुपाली पाटील ठोंबरे यांनी एकाच महिलेला किती संधी देणार असा सवाल उपस्थित केला आहे.

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights