अजित पवारांच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तूलातून गंमतीत गोळीबार; माजी नगरसेवकासह दोघांना अटक
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. विनोद जयवंत नढे असे माजी नगरसेवकाचे नाव असून त्यांच्यासह सचिन नढे याला देखील अटक करण्यात आली आहे. स्वतःच्या सुरक्षेतेसाठी विनोद नढे हे पिस्तूल वापरतात. याच पिस्तुलातून सचिन नढे यांने भिंतीच्या दिशेने फायरिंग केलं. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. ही घटना रात्री पावणे नऊ च्या सुमारास घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद नढे आणि त्यांचा चुलत भाऊ सचिन नढे यांच्यासह काही जण राहुल बार अँड खुशबू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर मद्यपान करत बसले होते. त्याच दरम्यान विनोद नढे यांना त्यांच्या चुलत्या चा फोन आला. कशाला फिरतो? काळजी घेत जा असा सल्ला चुलत्याने दिला. त्यावर विनोद नढे यांनी सांगितलं की, माझ्याकडे सुरक्षेसाठी पिस्तूल आहे. हे ऐकून चुलत भाऊ सचिन नढे याने गमतीत खरंच तुझ्याकडे पिस्तूल आहे, का? अशी विचारणा केली आणि ते पिस्तूल घेऊन लोड करून थेट गोळीबार केला. ती गोळी प्लेट ठेवायचा कपटावर लागली. सुदैवाने ही गोळी शेजारी बसलेल्या व्यक्तीला लागलेली नाही. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वाकड पोलिसांनी सचिन नढे आणि विनोद नढे या दोघांना अटक केली आहे.