ब्रेकिंग न्यूज
रवि. डिसेंबर 22nd, 2024

ठाकरे सेनेत आमदार सगळ्या इच्छुकांना व्हायचय पण … !

उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुका जवळ येवून ठेपल्या आहेत .पक्षाची बांधणी ,संभाव्य उमेदवारांची चाचपणी प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वांकडून केली जात आहे .वादातीत विषयात अडकून न  राहता  ८० वर्षाचे शेलार मामा म्हणजे शरद पवार अन त्यांचे नेते पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र ढवळून काढताना विरोधी फळीतला रोज एक संभाव्य आमदार आपल्या  गळ्याला लावत आहे .कॉंग्रेसचे नेते त्यांच्या परीने बांधणी करीत आहेत .भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकट्या फडनविसांएवजी गडकरी व बावनकुळे अशा तिघांच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोर जाण्याच धोरण हाती घेतलं आहे .मागच्या काळात एकट्या फडनाविसांच्या बळावर सर्वच निवडणुका लढल्या जायच्या मात्र आता जणू काही त्याचं राज्यातलं वाढत महत्व कमी करण्यासाठी म्हणा किवा त्यांची राज्यातली प्रतिमा खालावली म्हणून म्हणा पण जो निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतलाय तो नक्कीच फडनाविसंसाठी आत्मचिंतन करायला लावणारा नक्कीच आहे . त्यामुळे  केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयामुळे फडनाविसांच्या गोटात मोठी नाराजी असल्याचे बोलले जात आहे . कदाचित त्यामुळेच केंद्रीय नेतृत्व जरी महाराष्ट्रात घिरट्या घालत असले तरी फारसा प्रतिसाद दिसून येत नाही .शिंदे सध्या लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमात शेखचिल्ली स्वप्न रंगवत आहेत .अजित पवार गटात स्वतः सेनापतीनेच शस्र म्यान केल्याने सैनिक हवालदिल आहेत .त्यांच्यापैकी बरेच जण  परतीच्या  मार्गावर आहेत .तिसरी आघाडी जोमाने कामाला लागली आहे .ठाकरे सेनेचे नेते  वादातीत मुद्य्यांमध्ये मुंबईतच अडकून पडल्याने निवडणुकांच्या दृष्टीने जसे शरद पवार काम करीत आहेत हा आदर्श डोळ्यासमोर असताना देखील फारसे गंभीर दिसत नाही . एकट्या शेलार मामाच्या रोजच्या धक्कातंत्राने  मात्र  महाराष्ट्रातले राजकारण ढवळून निघाले आहे .

एकंदरीत महाराष्ट्रात जो तो पक्ष आप आपल्या परीने पक्षाच्या अस्तित्वासाठी प्रयत्नशील आहे .मात्र जळगाव जिल्ह्यात ठाकरे सेनेची अवस्था अशी झाली  आहे कि , निवडणुकांच्या दृष्टीने  वातावरण निर्मिती व संघटना वाढीसाठी कवडीचे प्रयत्न न  करता  येथे मात्र प्रत्येक इच्चुकला आमदार व्हायचे आहे .त्यांना ना गरज वाटते  संघटना बळकट करायची ,ना निवडणुकीच्या दृष्टीकोनातून कुठली विव्हानिती ठरवायची ,ना कार्याकार्यांच्या भावना जाणून घ्यायची .ना निवडणुकांच्या दृष्टीने वातावरण निर्मिती करायची .मग  त्यांना तिकीट काय फक्त सेटलमेंट करण्यासाठी हवय का ?असा प्रश्न त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे .नेते येतायत फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करतायत .पण येथल्या पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांच्या भावनाच बोथट असतील तर त्याचा कितपत उपयोग होईल असे वाटत नाही . खर्या अर्थाने ज्यांना मनापासून निवडणुका लढ्याच्या आहेत अशा  दोनच मतदार संघात ठाकरे सेनेची तयारी जोमात दिसते .एक पाचोरा व दुसरे चाळीसगाव बाकी ठिकाणी स्मशान शांतता आहे .इच्छुक टोपलीभर आहेत .तयारी मात्र एकाचीही कवडीची दिसत नाही .तिकीट मिळाल्यावर बघू .तिकीट म्हणजे काय अल्लाउद्दिनचा दिवा नाही कि लगेच चमत्कार घडेल . थोडीफार हालचाल एरंडोल मध्ये दिसते पण ती जागा कुणाला सुटेल यावर सगळ अवलंबून आहे .

जिल्ह्यात वैशाली सूर्यवंशी आणि भाजपचे विद्यमान खासदार असताना धाडसाचा निर्णय घेवून  ठाकरे सेनेत दाखल झालेले उन्मेष पाटील हे दोनच जण खर तर ठाकरे सेनेच्या स्वाभिमानाची लढाई खर्या अर्थाने लढताना दिसत आहेत .मुठभर निष्ठेच्या पुजार्यांना सोबत घेवून संघटना बळकट करण्यासाठी त्या दृष्टीने ते जोमाने कामाला लागले आहेत . निवडणुकीच्या तयारीने लढण कशाला म्हणतात याचा आदर्श ह्या दोघांचा समोर असताना तो घ्यायचा नाही मात्र इतर ठिकाणच्या इच्छुकांना आमदार मात्र व्हायचय . काहींना तर झाल्यासारख सुद्धा वाटतंय .  चाळीसगाव मध्ये तर शिवसेना कार्यकर्ते  बोटावर मोजण्या इतके होते .उन्मेष पाटील यांनी आज अल्पावधीत शिवसेना गावागावात पोहचवली .शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ,दुध उत्पादकांच्या प्रशावर ,नार पार च्या प्रश्नावर सातत्याने त्यांनी उठवलेला आवाज त्यासाठीचे आंदोलने यामुळे कुठे तरी ठाकरे शिवसेनेला जिह्ल्यात झळाळी मिळाली आहे .परंतु जिल्ह्यातल्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये इतकी मरगळ कुटकूटून भरलेली आहे कि ती मरगळ ,ती नाकारात्मता निघायलाच तयार नाही अर्थात ते निष्टावान नक्की आहेत याला दुमत नाही . परंतु संघटना व तिचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी इच्छाशक्तीची मोठी गरज असते .तीच नसल्याने  कार्यकर्ते हवालदिल आहेत .नेते आले कि ,नेत्यांच्या पुढ पुढ  करणे एव्हढेच काय ते काहींचे धंदे झाले आहेत .नेते बिचारे विस्वसाने जबाबदारी सोपवतात .त्यांचा विस्वासघात होणार नाही किमान याची तरी काळजी घेतली पाहिजे . खर तर ठाकरे सेनेच्या नेत्यांनी उन्मेष पाटील यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाकडे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या संघटनेची जबाबदारी देण्याची गरज आहे .त्यांच्याकडे बर्यापैकी संघटन कौशल्य आहे, त्यांचा शासकीय ,प्रशासकीय कामकाजाच्या प्रत्येक क्षेत्राचा  गाढा अभ्यास आहे .खानदेशात पक्षाच्या बळकटीसाठी अशा एका नेतृत्वाची गरज आहे .

 

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights