ब्रेकिंग न्यूज
रवि. डिसेंबर 22nd, 2024

खेला नक्की होबे! देवकर अपक्षच्या तयारीत ? तर ठाकरे सेनेची मोठी खेळी !

गुलाबराव पाटील /संजय राऊत

 

गुलाबराव पाटील /संजय राऊत

 

विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे तसतशा जळगाव ग्रामीण मतदार संघातल्या राजकीय घडामोडी गतिमान व्हायला लागल्या आहेत .खासकरून ठाकरेंच्या संजय दुरदृष्टीने हा मतदार संघ सावध व बारीकीने न्याहळला जात आहे .त्या दृष्टीकोनातून महिनाभरात ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांचा काल दुसरा दौरा झाला . तस तशी विरोधकांची घमेंड अन गुर्मीच प्रदर्शनही जनतेला पाहायला मिळत आहे .त्यांच्या कार्यकर्त्यांचा तोलही सुटतांना  शोषल मीडियाच्या माध्यमातून  दिसून येत आहे .तर हि जागा १०० टक्के ठाकरे सेना लढविणार असल्याचे निश्चित मानले जात आहे .त्यामुळे  गुलाबराव देवकरांची मोठी गोची झाली आहे .ते आता अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही होवू लागली आहे .दुसरीकडे  ठाकरे सेना मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचे ऐकिवात येत आहे .अगदी सामान्य आदिवाशी युवा कार्यकर्त्याला ठाकरे सेना  उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे .तर तिसऱ्या आघाडीकडूनही एका  माळी समाजाच्या  तरुण नेत्याचे  उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ऐकिवात येत आहे .

जळगाव ग्रामीण मतदार संघात अनुसूचित जाती व जमातीचे १ लाख १० हजाराच्या जवळपास मतदान आहे.त्यात कोळी समाजाचेच ७५ हजाराच्या जवळपास मतदान आहे . तर मुस्लीम समाजाचे ३१ हजार मतदान आहे . त्यात ठाकरे सेनेची  व उद्धव ठाकरेंना मानणाऱ्या व त्यांच्याशी आमदारांनी केलेल्या गद्दारी मुळे त्यांच्या बद्दल सहानुभूती असणाऱ्या सर्व समाजाची मते लक्षात घेतली तर हे गणित अडीच  लाखाच्या वर जाते .हे सगळ गणित लक्षात घेवून ठाकरे सेनेकडून विव्हानिती आखली जात असल्याचे समजते .त्यामुळे आदिवाशी समाजाचा  उच्च्चशिक्षित व तरुण उमेदवार देण्याविषयी ठाकरे गटात सध्या खल सुरु असल्याचे ऐकिवात येत आहे .तसे झाल्यास आदिवाशी समाजाला पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षाची उमेदवारी जळगाव ग्रामीण मतदार संघात मिळणार असेल तर हि बाब आदिवाशी व दलित समाजासाठी नक्कीच स्वाभिमानाची ,अभिमानाची असणार आहे .आमदार होण्याची संधी दलित आदिवाशी समाजाला मिळाल्यास त्यांच्यासाठी हि संधी पर्वणी ठरेल व राज्यात इतिहास घडेल असे ठाकरे सेनेला वाटत असावे .

कोळी समाजाने अनेक आंदोलने केलीत विद्यमान सरकार व पालकमंत्र्यांकडून आस्वसनाच्या पलीकडे या समाजाच्या पदरात काहीच पाडले नाही त्यामुळे कोळी समाजाचा प्रचंड राग  सरकार व पालकमंत्री यांच्यावर आहे . गुजरात मध्ये अल्पावधीत सरदार पटेलांचा पुतळा उभा राहतो परंतु पाच वर्ष पूर्वी मोदिनी भूमिपूजन केलेल् शिवस्मारक उभे राहत नाही .त्या जागेचा शोध दस्तुरखुद्द छत्रपतींच्या घराण्याच्या वारसदाराला घ्यावा लागतोय याहून दुर्दैव ते कोणते .त्यामुळे शिवप्रेमी व मराठा समाजामध्ये देखील प्रचंड संताप व्यक्त होत आहे .ज्या छत्रपतींच्या नावावर गुलाबराव पाटील मंत्रिपदापर्यंत पोहचले त्या  छत्रपतींचा पुतळा पडला त्यावर गुलाबराव पाटील यांनी साधी खंत देखील व्यक्त केली नाही .याचंही राग शिवप्रेमींमध्ये आहेच .कोळी ,धनगर ,ओबीसी ,राजपूत भामटा प्रमाणपत्राच्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागण्यासाठी आंदोलने करून देखील पालक मंत्र्यांनी त्या जाचक अटी रद्द करण्यासाठी  कुठलेही प्रयत्न केले नाहीत. या बद्दलचा रागही त्या त्या समाजात आहे . अशी एक न अनेक बाबतीत पालकमंत्री यांच्या बद्दल प्रचंड नाराजी असल्याने त्या नाराजीचा  व दलित आदिवाशी घटकाच्या मतदाराची टक्केवारी पाहता आपला उमेदवार सहज निवडून येवू शकतो . असा कयास कदाचित ठाकरे सेनेचा असावा .

पालकमंत्र्यांचा विकास कामांचा दावा 

पालकमंत्री मी मोठ्या प्रमाणात विकास कामे केलीत असा दावा नेहमी करत असतात .त्यावरहि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता लोक अस म्हणतात ,कि ,आम्ही त्यांना कशासाठी निवडून दिले होते ! कामे करण्यासाठी न ! का गोट्या भवरे खेळण्यासाठी ? मग हे कामे केलीत ! कामे केलीत हि उपकाराची भाषा आम्हाला का दाखविता ! कुणीही नेता उठतो अन म्हणतो आम्ही कामे केलीत .अरे बाबा तुला त्याच्यासाठीच निवडून दिले होते .तुला काही गोट्या भवरे खेळण्यासाठी नाही .त्यामुळे कोणत्याही पुढार्यांनी कामे केली म्हणून ते काही उपकार नाही करत ते त्यांचे कर्तव्यच आहे .अन ते काही त्यांच्या प्रोपर्ती विकून नाही करत . जनतेच्या कराच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीचा उपयोग  जनतेच्या सोयी सुविधा नाही करणार तर कुठे करणार हि लोक ..त्यातही कोणता नेता काही वर्षापूर्वी काय होता अन आता किती कोटींचा धनी झालंय हेही जनता उघड्या डोळ्यांनी बघतेच आहे कि …  अशा संतप्त प्रतिकिया सुशिक्षित ,बेरोजगार तरुण व जाणकार मतदारांमध्ये व्यक्त होत आहेत .

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights