जळगाव – एकनाथ खडसे हे काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये गेले होते. मात्र, महाराष्ट्रातील भाजप नेते त्यांच्या पक्षप्रवेशाविषयी काहीच बोलत नव्हते. गिरीश महाजन तर यावरुन खडसेंची खिल्ली उडवत होते.
भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेशही झाला होता. मात्र, यानंतर भाजपने त्याबाबत घोषणा केलीच नाही. आता या सगळ्याला पाच महिने उलटून गेल्यामुळे मी भाजप प्रवेशाच्या विषयावर फुली मारली आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते.
एकनाथ खडसे यांच्या मुलाखतीनंतर आता महाराष्ट्र भाजपमध्ये हालचाली दिसून येत आहेत. नाथाभाऊंचे कट्टर विरोधक असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये सामावून घेण्याविषयी भाष्य केले आहे. एकनाथ खडसे मुलाखतीत काय म्हणाले, ते मी ऐकलं नाही. त्यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला मान्यच आहे. त्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करुन एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आता महाराष्ट्र भाजप एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कधी आयोजित करणार, हे पाहावे लागेल. तसेच एकनाथ खडसे भाजपचा हा प्रस्ताव स्वीकारणार का, हेदेखील बघावे लागेल.
यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि ,भाजपात महाराष्ट्रातल्या कुणाही व्यक्तीचा पक्षप्रवेश फडणविसांना डावलून जर राष्ट्रीय नेतृत्व करत असतील तर त्या पक्ष प्रवेशाला शून्य किंमत असते .राष्ट्रीय नेतृत्वची किंमत फडनाविसांपुढे किती नगण्य आहे हे खडसे यांच्या पक्ष प्रवेशावरून शिद्ध झाले आहे . पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात भाजप राज्यात लयास चालला असताना देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून फडणवीसांच्या या महान कामगिरीला बहादुरीचा मुलामा देवून वास्तव दुर्लक्षित केले जाते .एव्हढा दरारा फडनाविसांचा भाजपात आहे .
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले होते ?
मी भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर फुली मारुन टाकली आहे. इतके दिवस मला बाहेर राहणं, मी प्रवेश घेतो असं कधी म्हटले नव्हते. मला प्रवेश घ्या, असं सांगण्यात आलं, त्यामुळे मी पुन्हा भाजपमध्ये गेलो. मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन मी भाजपमध्ये गेले. माझ्यासारख्या माणूस ज्याने 40 वर्षे भाजपचं काम केलं, इतकी वर्षे काम करुन मी बहुजनांना भाजपशी जोडलं,महाराष्ट्र पिंजून काढला अनेकदा, चेष्टा सहन केली. इतकं सगळं केल्यानंतर भाजपमध्ये मला प्रवेश द्या, ही विनंती करणं माझ्यादृष्टीने अपमानास्पद आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
फडणवीसांकडून राज्यपालपदाची ऑफर ; खडसेंचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस यांनी मला काही वर्षांपूर्वी राज्यपाल पदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी ‘माझा कट्टा’वर केला होता. मला एक दिवशी देवेंद्र फडणवीसांनी बोलवले. तुम्ही म्हणता ना पंकजाला न्याय झाला तसाच न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी आम्ही दोघेच होते. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर मी म्हणालो, देवेंद्रजी खरं सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितलं की हे करणार, ते देणार ते काही झालं नाही त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. मी म्हटलो राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही. ते म्हणाले, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय झालं मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिली होते. साधारण ही गोष्ट 2019 सालातील आहे, असे नाथाभाऊंनी सांगितले होते.
दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून नाथाभाऊंचं स्वागत करू; गिरीश महाजन यांची अत्यंत खोचक टीका
आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये आहेत की राष्ट्रवादीत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. आधी भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगणारे खडसे आता अचानक शरद पवार गटातच आपण आहोत असं सांगत आहेत. त्यामुळे संभ्रम अधिकच वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. एकनाथ खडसे यांच्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून आम्ही नाथाभाऊंचं स्वागत करू, अशी खोचक आणि बोचरी टीका भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
एकनाथ खडसे यांचा दिवाळीनंतर भाजप पक्षप्रवेश होत असेल तर आम्ही फटाके फोडून त्यांचे स्वागत करू. दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून एकनाथ खडसेंचे आम्ही स्वागत करू. देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशा बाबत सांगत आहे तर मग कोणाचा विरोध राहील? खडसे भाजपमध्ये येणार म्हटल्यावर थोडे जास्तीचे फटाके आम्ही घेऊन ठेवू. दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून एकनाथ खडसेंचे आम्ही स्वागत करू, अशी टीकाच गिरीश महाजन यांनी केली आहे.